Download App

Gautami Patil ला नगरमध्येही नो एंट्री; अनंत चतुर्थीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली

  • Written By: Last Updated:

Gautami Patil : ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil) तसेच लावणी क्वीन ही कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. कधी टीव्हीवर तर कधी सोशल मीडियावर (Social media) तीच्या प्रत्येक गोष्टीची काहींना काही चर्चा सुरूच असते. त्यात तिच्या कार्यक्रमांची विशेष चर्चा असते. कारण पोलिसांना या कार्यक्रमात झालेला गोंधळ आणि गर्दीला आवरणे कठीण होते. त्यात आता अहमदनगरमध्ये देखील तिच्या कार्यक्रमाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Eknath Shinde : शिंदेंनी परदेश दौरा पुढे ढकलला; दानवे म्हणाले, ‘ये डर अच्छा हैं’

गौतमी पाटीलला नगरमध्येही नो एंट्री…

गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हटलं की, तरूणांचा गोंधळ, गर्दी आणि कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होते. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये आता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली आहे. अनंत चतुर्दशी म्हणजे गणेश विसर्जनाच्या दिवशी अहमदनगरमध्ये पाईपलाईन रोड या भागातील मृत्यूंजय गणेश मंडळाले गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. त्याला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

हीच नफा कमावण्याची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिली व्यापाऱ्यांना ‘बिझनेस आयडिया’

दरम्यान कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होते म्हणूनच कोल्हापूर शहरामध्ये देखील गौतमीच्या (Gautami Patil) कार्यक्रमाला परवानगी नाकरण्यात आली होती. त्यामुळे सुरूवातीला अक्षरश: डोक्यावर घेतल्या गेलेल्या गौतमीच्या कार्यक्रमाला आता मात्र तुफान गर्दी होते. त्यातून कार्यक्रमात गोंधळ उडतो. गर्दीला आवारणे पोलिसांना अवघड जाते. त्यामुळे पोलिस गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारू लागले आहेत.

‘हे’ सेव्हन स्टार मोदींनी पुन्हा मध्य प्रदेश मिळवून देणार? सात खासदारांना तिकीट देण्यामागे आहे खास ‘लॉजिक’

गौतमी लवकरच मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार

गौतमी (Gautami Patil) लवकरच एका मराठी सिनेमात दिसणार आहे. तिच्या या सिनेमाचं नाव घुंगरू असं आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते या सिनेमाची वाट बघत आहेत. आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख देखील घोषित करण्यात आली आहे. सध्या गौतमीचा पहिला मराठी सिनेमा घुंगरू हा पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Tags

follow us