Mumbai University : भारतात क्रिकेट फक्त एक खेळ नसून अनेकांचे भावना या खेळाशी जुळले आहे. जर तुम्ही देखील या खेळात माहीर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला क्रिकेटचा अभ्यास करून पदवीधर होता येणार आहे. होय, मुंबई क्रिकेट संघटना म्हणजेच एमसीए (MCA) लवकरच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने असा पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहे. याबाबत एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
मिळणार प्रत्यक्ष मैदानावर शिकण्याचा अनुभव
फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात आज क्रिकेट (Cricket) एक व्यावसायिक खेळ झाला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमामध्ये मैदानाची निगा, खेळपट्टी तयार करणारे, व्हिडीओ विश्लेषक, प्रशिक्षण, स्कोअरिंग, पंच या सारख्या अनेक गोष्टी शिकण्यास मिळणार आहे. तसेच क्रिकेटपटूंना प्रत्यक्ष मैदानावर शिकण्याचा अनुभव मिळणार आहे आणि त्यांना विविध विषयांत व्यावसायिक कौशल्य या अभ्यासक्रमाद्वारे मिळवता येणार, याच बरोबर त्यांना शैक्षणिक पात्रताही मिळेल अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अभ्यासक्रमात काय असणार?
या अभ्यासक्रमात क्युरेटर, अंपायरींग, खेळपट्टी तयार करणारे, व्हिडीओ विश्लेषक, प्रशिक्षण, स्कोअरिंग, यांसारख्या विविध अभ्यासक्रमाचा यामध्ये असणार आहे. एमसीए मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहे. सध्या अनेक खेळाच्या संदर्भात अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात आहेत. त्यामुळे यासंदर्भात मुंबई विद्यापीठाची प्रायमरी चर्चा सुरू आहे. माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी यावर काम करत आहेत. सगळ्यांची मदत घेऊन हा प्रोग्राम यशस्वीपणे राबवू अंस देखील एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले.
चहूबाजूंनी आरोपांच्या पिंजऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना अजितदादांकडून राष्ट्रवादीत ‘मानाचं पान’
कोणाला मिळणार प्रवेश?
एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभ्याक्रमात प्रवेश घेणारा विद्यार्थी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सदस्य असावा, याच बरोबर त्यांने अंडर 19,23 स्पर्धा खेळले पाहिजे हे लक्षात ठेवून हा कार्यक्रम सुरु केला जाणार आहे. क्रिकेटमध्या विविध टेक्निक शिकवणारे हे एक हायब्रीड मॉडेल असणार आहे. अशी देखील माहिती एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली.