Girish Mahajan Claim damage reputation on Jurnalist Anil Thatte and Eknath Khadase : भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांच्यातील वाद काहीनवे नाहीत. मात्र आता गिरीश महाजनांनी थेट एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
पत्रकार अनिल थत्ते यांनी कही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात त्यांनी मंत्री गिरिश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्याशी संबंध असून त्यांचे त्यांना फोन येत असतात. असा आरोप थत्ते यांनी केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील याच विषयावरून महाजनांवर टीका केली होती. मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत महाजनांनी थेट एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे. असे वृत्त एबीपी माझा या वाहिनीने दिले आहे.
‘फुले’ चित्रपट प्रकरण, अकलेचा कांदा… म्हणजे कोण? संजय राऊतांना महसूल मंत्री बावनकुळेंचं प्रत्युत्तर
तर या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, कोणीही माझ्यावर काहीही आरोप करत असल्याने माझी प्रतिमा मलिन होते. त्यामुळे मी ही अब्रt नुकसानीची नोटीस माझ्या मुंबईतील वकीलाच्या मार्फत पाठवलेली आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना ही नोटीस मिळाली असेल आणि त्याविरोधात आपण आता थेट कोर्टातच लढणार आहोत असं महाजन म्हटले आहे.
मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये राजकीय वैर आहेत. त्यातून दोघेही एकमेंकावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. दोघेही एकमेंकांना पाण्यात पाहतात. त्यातून एकनाथ खडसे यांनी अनेकदा गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना कमरेखालची भाषा वापरली आहे. त्यांचे सर्व संपलेले आहे. मी जर त्यांच्याविषयी बोललो तर त्यांना घराबाहेर पडता येणार नाही, असेही गिरीश महाजन यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते.