मुख्यमंत्र्यांबाबत एकेरी भाषा अयोग्य, पहिली टर्म शेवटची ठरू नये, गिरीश महाजनांचा सुहास बाबरांना इशारा

शिंदेसेनेचे आ. सुहास बाबरांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

Untitled Design (368)

Untitled Design (368)

Girish Mahajan’s warning to Suhas Babar : शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. “माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे. एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे सुहास बाबर? त्याचं उत्तर तुला मुख्यमंत्री देतील” असे वक्तव्य करत सुहास बाबर यांनी भाजपच्या नेत्यावर टीका केली होती.

या विधानावर प्रतिक्रिया देताना राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी सुहास बाबर यांची भाषा अयोग्य असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. एका वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले, “मी आताच हे वक्तव्य पाहिले. सुहास बाबर ज्या भाषेत बोलत आहेत, ती अत्यंत चुकीची आहे. ही त्यांची पहिलीच टर्म आहे.” महाजन पुढे म्हणाले, “शिवसेना नेते अनिल बाबर हे माझे चांगले मित्र होते. गेल्या 35 वर्षांपासून मी सभागृहात आहे. अनिल बाबर अनेक वेळा निवडून आले, मात्र त्यांच्या बोलण्यात कधीही असा तोल गेला नाही. पण त्यांच्या चिरंजीवांची भाषा पाहून आश्चर्य वाटले.”

माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री… शिंदेंच्या आमदाराचा भाजपला इशारा

मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरी उल्लेख करणे गंभीर बाब असल्याचे नमूद करत महाजन म्हणाले, “ते असे बोलत आहेत की सर्व पक्ष त्यांच्या खिशात आहेत. सर्व राजकारण तेच चालवत आहेत, असा दावा करणे चुकीचे आहे. अजून त्यांच्या राजकारणाची सुरुवात आहे. वर्ष-दीड वर्षांपूर्वी ते निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी तोलूनमापून बोलायला हवे.”

सुहास बाबर यांना समज देण्याची गरज असल्याचे सांगत महाजन म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज द्यावी. अन्यथा राजकारणाची सुरुवातच शेवट ठरू शकते. भाजपाला खिशात ठेवण्याची भाषा योग्य नाही. फार हवेत राहू नये. पहिली टर्म आहे, ती शेवटची ठरू नये.” या संपूर्ण प्रकरणामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून, येत्या काळात याचे पडसाद राजकीय पातळीवर उमटण्याची शक्यता आहे.

Exit mobile version