Download App

‘न्यायालयात टिकणारंच आरक्षण द्या’; रोहित पवारांची CM शिंदेंना हात जोडून विनंती

Rohit Pawar On Maratha Reservation : पुढील काळात मराठा समाजाला (Maratha Reservation) जे आरक्षण सरकार देणार आहे, ते आरक्षण न्यायालयात टिकेल असंच द्यावं, न्यायालयात आरक्षण का टिकलं नाही याचा पूर्ण अभ्यास करुनच द्यावं, अशी हात जोडून विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलेलं असतानाच अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. याच चर्चेदरम्यान, रोहित पवार यांनी मराठा आरक्षणावर रोखठोकपणे आपली भूमिका मांडली आहे.

हिवाळी अधिवेशनात सध्या मराठा आरक्षणावर चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान, बोलताना रोहित पवार म्हणाले, आत्तापर्यंत मराठा समाजाला अनेकदा आरक्षण दिलं गेलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात दिलं गेलं. त्यानंतर 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात दिलं. त्यानंतर ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. मग सर्वोच्च न्यायालयात आरक्षण का टिकलं गेलं नाही? याचा अभ्यास करायला हवा, गायकवाड समितीने अभ्यास न केल्यानेच सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं नसल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी यावेळी केला आहे.

Shahrukh Khan : डंकीच्या प्रदर्शनाआधी शाहरुख मुलगी सुहानासह साई चरणी, शिर्डीत चाहत्यांचा जल्लोष

तसेच पुढे बोलताना ते मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कसं देता येईल याबाबत, विस्तृतपणे मांडणी केली आहे. एखाद्या समाजाला आरक्षण कसं देता येतं. त्यासाठी समाजाला मागास सिद्ध करावं लागत. त्यासाठी इम्पिरिकल डेटा आवश्यक असतो. आरक्षणासाठी जातिनिहाय जनगणना करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने सर्वात आधी जातिनिहाय जनगणना करणं आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

मोदी शाहांविरोधात घोषणा, सभागृहात गोंधळ; विरोधी पक्षाचे 15 खासदार निलंबित

मराठा आरक्षणाचा मुद्दा इंदिरा सहानी खटल्यापर्यंत येऊन अडकतो. इंदिरा सहानी खटल्यात आरक्षणाची मर्यादा 50 टक्के एवढी असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यातील सर्वच नेत्यांसह राज्य सरकारने आरक्षणासाठी मर्यादा कशी वाढवता येईल, त्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावायला हवा. आरक्षणाची मर्यादा वाढवून सरकारने धनगर, मराठा, लिंगायत बांधवांना आरक्षण द्यावं, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे ते आरक्षण देणारच आहेत. फक्त हात जोडून एकच विनंती आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काळात देणारं आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयात टिकणारंचं द्यावं, तेही संपूर्ण अभ्यास करुनच, अशी विनंती असल्याचं आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.

तरुणांवरील गुन्हे मागे घ्या…
मराठा आरक्षणासह इतर विविध सामाजिक आंदोलनांप्रकरणी राज्यातील युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. जालन्यातील अंतरवली सराटीतही पोलिसांनी महिलांवर लाठीचार्ज केल्यानेच युवकांकडून प्रतिकार करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यासोबतच कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात मराठा समाजासह इतर समाजातील युवकांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Tags

follow us