शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंनी आमदारांना दिलं ‘पंचामृत’; हिवाळी अधिवेशन तापणार

शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंनी आमदारांना दिलं ‘पंचामृत’; हिवाळी अधिवेशन तापणार

Uddhav Thackeray : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Assembly Session)उद्यापासून (दि.7) नागपूरमध्ये(Nagpur) सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena Thackeray group)शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारला घेरण्यासाठी प्लॅन तयार करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना पाच मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, मुंबईमधील (Mumbai)सर्वसामान्यांचे प्रश्न विचारण्याच्या सूचना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्या आहेत.

Animal मधील फायटर मशीनगन महाराष्ट्रात बनली; 18 मिनिटांच्या सीन्ससाठी मोजले एक कोटी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रश्न, मुंबई महापालिकेचा रस्ते कॉंक्रिटीकरण घोटाळा, फर्निचर घोटाळा त्याचबरोबर धारावी पुनर्विकास प्रकल्पाला कडाडून विरोध करण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर आरोग्य विभागाशी संबंधित प्रकरण हे बाहेर काढलं जाणार असल्याची माहिती देखील समजली आहे.

Animal मधील फायटर मशीनगन महाराष्ट्रात बनली; 18 मिनिटांच्या सीन्ससाठी मोजले एक कोटी

ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणावरही सरकारला जाब विचारला जाणार आहे. उद्धव ठाकरे हे 11 किंवा 12 डिसेंबरला नागपूरमध्ये जाऊन अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनामध्ये आक्रमकपणे मांडण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्या आहेत.

उद्या सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारकडून आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ-मोठ्या घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारचं हे शेवटचं हिवाळी अधिवेशन असणार आहे.

या अधिवेशनानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या काळातच लोकसभा आणि त्यानंतर काही महिन्यामध्येच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारसाठी पोषक असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारचा असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठ-मोठ्या घोषणा देखील करण्याची दाट शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube