Uddhav Thackeray : हिंमत दाखवा, बॅलट पेपरवर निवडणुका घ्या! PM मोदींना ठाकरे गटाचे ‘गॅरंटी’चे आव्हान

Uddhav Thackeray : हिंमत दाखवा, बॅलट पेपरवर निवडणुका घ्या! PM मोदींना ठाकरे गटाचे ‘गॅरंटी’चे आव्हान

Uddhav Thackeray : देशातील पाच राज्यांचे निवडणूक निकाल लागले. या पाचपैकी तीन राज्यातील सर्वच एक्झिट पोलचे (Uddhav Thackeray) अंदाज ध्वस्त करत भाजपने महाविजय साकारला. राजस्थान आणि छत्तीसगडच्या सत्तेतून काँग्रेसला बेदखल केलं तर मध्य प्रदेशातील सत्ता कायम राखली. भाजपाच्या या प्रचंड विजयानंतर विरोधकांकडून प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर आज ठाकरे गटाने सामनातून भाजपवर (Election Results 2023) जोरदार टीका केली आहे. मोदींची गॅरंटीचाही चांगलाच समाचार घेतला आहे. (Uddhav Thackeray Group Challenges Pm Modi and BJP for election)

जनतेच्यावतीने एकच मागणे आहे एक फक्त एक निवडणूक बॅलट पेपरवर घ्यायची हिंमत दाखवा. लोकशाहीसाठी तेवढी एक गॅरंटी द्याच. आता यावर काही टिल्ले पिल्ले सांगतात मग ईव्हीएमने तेलंगणात कसा विजय मिळवला. मोठा दरोडा लपविण्यासाठी थोडा माल मोकळा ठेऊन दरोडेखोर पळाले. हीच एक मास्टर स्ट्रॅटेजी आहे व हीच आधुनिक चाणक्यनीती आहे. पुढील लढाई ही फक्त विचारधारा, हुकूमशाहीविरुद्ध नसून लोकशाहीतील या दरोडेखोरीविरुद्ध आहे. पंतप्रधान मोदी यांनी लोकशाही वाचविण्याची गॅरंटी द्यावी. ईव्हीएमचा मूड म्हणजे जनतेचा मूड नाही. फक्त एकदाच बॅलट पेपरवर निवडणुका घ्या. म्हणजे गॅरंटीचे खरे खोटे उघड होईल, असे आव्हान ठाकरे गटाने दिले आहे.

MP Election 2023 : शिवराज सरकारचा गड आला पण सिंह गेला, वादग्रस्त गृहमंत्र्यांना मतदारांचा झटका

2024 ची लोकसभेची सेमी फायनल भाजपाने जिंकली आहे. मात्र सेमी फायनल जिंकणारा फायनल जिंकतोच असे नाही. मात्र पंतप्रधान मोदींनी फायनल जिंकण्याची गॅरंटी दिली आहे. जो तो आपल्या पद्धतीने पाचही राज्यांमधल्या जय पराजयाचं विश्लेषण करत आहे. मिझोरम विधानसभा निवडणुकीचाही निकाल लागला आहे. तिथे स्थानिक पक्षांना यश मिळालं. देशाचे किंवा जगाचे नेते असलेले पंतप्रधान मोदी मिझोरम जिंकू शकलेले नाहीत. देशात सर्वत्र मोदी मॅजिक चालत नाही. त्यामुळेच देशात पूर्णपणे लोकशाही खतम करता आलेली नाही. भाजपने मोदींच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब केले तर राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकानावर शुकशुकाट झाल्याचा दावा भाजपने केला आहे.

हे गॅरंटी प्रकरण काय आहे. मोदींनी 2014 पासून अनेक गॅरंट्या दिल्या होत्या व प्रत्येक निवडणुकीत त्यांचे गॅरंटी कार्ड वाढत असते. परदेशातील काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी त्यांनी दिली. त्या गॅरंटीचे काय झाले भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करून भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची गॅरंटी होती. पण काही भ्रष्टाचारा परदेशात पळून लावले व उरलेले भ्रष्टाचारा भाजपात घेऊन त्यांना मंत्री करण्यात आले. भ्रष्टाचाऱ्यांना भाजपात आणून शुद्ध करण्याची ही नवी गॅरंटी आहे. काश्मीरसह देशातील दहशतवाद संपवण्याची गॅरंटी होती. मोदींच्या डोळ्यांसमोर पुलवामा, पठाणकोट, उरी घडले. काश्मीरला रोज जवानांच्या हत्या सुरुच आहेत. मणिपुरातील दहशतवादाने कहर केलाय. काय झाले दहशतवाद संपविण्याच्या गॅरंटीचे असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

Uddhav Thackeray : ‘आवळा देऊन कोहळा काढण्याची सरकारची हातचलाखी’ दरवाढीवर ठाकरे गटाचा टोला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube