Good news for farmers Monsoon reactivated heavy rain warning for Maharashtra and several other states : जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यभर पावसाने धुव्वाधार बॅटींग केली. आता राज्यात विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र आता हवामान विभागाकडून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, पुढील काही दिवसात महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अनेक भागात धो धो पावसाला सुरुवात होणार आहे. कारण मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याचं हवामान विभागाने सांगितलं असून अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने देशातील 14 राज्यांना वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचे इशारा दिला आहे पुढील 12 तासांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 75 किलोमीटर पोहोचण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे.
अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचं निधन; वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या हरियाणा उत्तर प्रदेश पासून मनिपुर पर्यंत मान्सूनचा पट्टा विस्तारलेला आहे त्याचबरोबर उत्तर बांगलादेश आणि लगतच्या भागांवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असल्याने पुढील दोन ते तीन दिवसात ईशान्य भारत पश्चिम बंगाल आणि बिहार मधील काही ठिकाणी मुसळधार त्या मुसळधार पावसाचा अंदाज भर्तवण्यात आला त्याचवेळी पुढील चार ते पाच दिवसात पूर्व उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या सर्व वातावरणाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील काहीशी विश्रांती घेतलेला मानसून पुन्हा एकदा बरसणार आहे. त्यामुळे सुरुवातीला आलेल्या मुसळधार पावसानंतर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
