व्हा उद्योजक! मराठा तरुणांना मोठं गिफ्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी दिल्याची घोषणा फडणवीस यांनी केलीयं.

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis

Annasaheb Patil Economically Backward Development Corporation : एकीकडे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपोषणाची हाक दिल्यानंतर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मराठा समाजाला खुशखबर दिलीयं. अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी दिल्याची घोषणा फडणवीस यांनी केलीयं. त्यामुळे आता मराठा समाजात नवीन उद्योजक तयार होण्यास मदत होणार आहे.

VIDEO : परीक्षेच्या आधी मध्यरात्री घेत होता रिव्हीजन…शिवराज मोटेगावकरचं नाव मोठं अन् लक्षण खोटं

मराठा समाजाच्या तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबवते. अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी फडणवीस सरकारने 2025-26 या अर्थिक वर्षांत 750 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली होती. 750 कोटी रुपयांपैकी 300 कोटी रुपयांचा निधी वर्गही करण्यात आला होता. त्याविषयी शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला.

सोनी लिव्ह 5 जून रोजी घेऊन येत आहे ‘Gullak 5’ ; ‘स्लाइस-ऑफ-लाइफ’ मालिकेचे भव्य पुनरागमन

राज्याच्या नियोजन विभागाकडून अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आलीयं. सदरील निधई खर्च करताना राज्य शासनाने ठरवून दिलेली कार्यनियमावली, वित्तीय नियमावली, अटी शर्तींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. खर्च करतानाही कोणतीही अनियमितता होणार नसल्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

मराठी भाषा वादावर नितीन गडकरींचे मौनभंग; शेखर सुमन यांना म्हणाले, “तुम्हीही बिहारी आहात!”

मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 29 ऑगस्ट 1998 रोजी करण्यात आली होती. त्यानंतर महामंडळाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. दरम्यान, अर्थसंकल्पातील मंजूर निधीपैकी 20, 30, 40, 50 टक्के निधी वितरीत करण्यात येतो. हा निधी खर्च केल्याची माहिती नियोजन विभागाला दिली जाते. त्यानंतर पुढील निधीची तरतूद करण्यात येते.

Exit mobile version