VIDEO : परीक्षेच्या आधी मध्यरात्री घेत होता रिव्हीजन…शिवराज मोटेगावकरचं नाव मोठं अन् लक्षण खोटं

नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर परीक्षेच्या काही दिवस आधी मध्यरात्री विद्यार्थ्यांची रिव्हीजन घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Untitle (24)

Neet Exam Paper Leak : नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी (Neet Exam Paper Leak ) दररोज नवनवीन खुलासे समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकरनेच (Shivraj Motegoankar) पेपर फुटीचा संपूर्ण कट आखल्याचं तपासात समोर येत आहे. अशातच आता शिवराज मोटेगावकरच्या फेसबुक पेजवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून परीक्षेच्या काही दिवसत आधी शिवराज मोटेगावकर निवडक विद्यार्थी घेऊन मध्यरात्री रिव्हीजन घेत असल्याचं या व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळे शिवराज मोटेगावकर परीक्षा होण्याआधी विद्यार्थ्यांना मध्यरात्री रिव्हीजन घेत परीक्षेला येणाऱ्या महत्वाच्या प्रश्नांबाबत माहिती देत होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शिवराज मोटेगाकरचा हा तिसरा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होतोयं. या व्हिडिओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांची रिव्हीजन घेत आहे. मध्यरात्रीचे रिव्हीजन वर्ग आता सीबीआय यंत्रणांच्या रडारवर आहेत. परीक्षेच्या आधी काही दिवस निवडक विद्यार्थ्यांना घेऊन रिव्हीजन घेतानाचा हा व्हिडिओ आहे. ही रिव्हीजन रात्रीच्या साडेअकरा वाजता सुरु असल्याचं एका विद्यार्थीनीने व्हिडिओमध्ये सांगितलंय. यासोबतच विद्यार्थीनीने शिवराज मोटेगावकरचे स्तुतिसुमनेही गायले आहेत.

नीट पेपरफुटी प्रकरणात न्यायालयाने पाच आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर या प्रकरणात आरोपी शुभम खैरनार याच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. सीबीआयने न्यायालयासमोर सादर केलेल्या तथ्यांच्या आधारे, न्यायालयाने आरोपी मंगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल, यश यादव आणि धनंजय लोखंडेला २ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.

अली अब्बास जफर यांच्या चित्रपटात पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर डान्स करताना दिसणार अहान पांडे!

दरम्यान, नीट पेपर फुटी प्रकरणी नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएची आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पार पडणार असून या बैठकीमध्ये पेपर लिक होण्यासंबंधीच्या विषयावर चर्चा होणार आहे. पुढील काळात असे प्रकार टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर चर्चा पार पडणार आहे. म्हणजेच पुढील काळात पेपर लिक होणार नाही, त्यासाठी सुधारणांवर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे.

‘कॉकरोच जनता पार्टी’चा धुमाकूळ! सरन्यायाधीशांनी ‘झुरळ’ म्हटलं अन् मराठी तरुणाने थेट पक्षच काढला

तर दुसरीकडे देशाचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून पेपरफुटी प्रकरणाची दखल घेण्यता आली आहे. बोगस टेलिग्राम चॅनेल शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रधान यांनी यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे आता विविध स्तरांवर नीट पेपरफुटीनंतर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

follow us