पंढरपूर : कोरोना काळानंतर आता पुन्हा एकदा विठ्ठल भक्तांचा पंढरीत येण्याचा ओघ वाढला आहे. किंवा गेले दोन वर्ष विठुरायाच्या भेटीसाठी आतुर असलेल्या भक्तांकडून पंढरपूरमध्ये मोठी गर्दी देखील निर्माण होत आहे. यादरम्यान अनेक भक्त विठ्ठलाची महापूजा किंवा पाद्यपूजा करतात. पण या पूजा करण्यासाठी अनेकदा वेळेची आणि काही वेळा खर्चाची देखील मर्यादा येते. त्यावर पर्याय म्हणून मंदीर समितीने एक निर्णय घेतला आहे.
गुढी पाडव्यापासून विठ्ठलभक्तांसाठी विठ्ठलाची तुळशी अर्चन पूजा सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती मंदीर समितीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता भक्तांना महापूजा किंवा पाद्यपूजा जरी करायला नाही मिळाली तरी त्यांची विठ्ठालाच्या पुजेची इच्छा पूर्ण होणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात भक्तांना ही पूजा करता येणार आहे. कारण दिवसातून 3 वेळा ही पूजा करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी किमान 10 कुटुंबांना ही पूजा करता येणार आहे. तर एका जिवसात 30 कुटुंबांना ही पूजा करता येणार आहे.
Shirdi Saibaba : हैद्राबादेतील साईभक्ताकडून साईचरणी नवरत्नजडीत सोन्याचा हार
या अगोदर केवळ भक्तांना विठ्ठलाची महापूजा किंवा पाद्यपूजा करता येत होती पण आता तुळशी अर्चन पूजा देखील करता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांरपासूनची हा मागणी आता मंदीर समितीकडूर पूर्ण करण्यात आली आहे. ही पूजा करताना भविकांना विठुरायाच्या पायावर तुळशी अर्पण करता येतील. मंदीर समितीकडून प्रसादही दिला जाणार आहे. या पूजेसाठी भक्तांना मंदीर समितीकडे 2100 रूपये भरावे लागणार आहेत.