Download App

शरद पवार जन्म १०० शकुनी मेल्यावर झालाय; भाजप आमदार पडळकरांची पवारांवर घणाघाती टीका

हे मारकडवाडी सर्वप्रथम कुणाल दिसलं. हे गाव माझ्या पै-पाहुण्यांचं गाव आहे. 90 टक्के येथे धनगर समाज राहतो. म्हणून माझी

  • Written By: Last Updated:

Gopichand Padalkar on Sharad Pawar : राज्याचे लक्ष आज मारकडवाडीकडे लागलेल आहे. इथल्या काही बांधवांचे फोन आम्हाला आले आणि त्यांनी असे सांगितले की, मारकडवाडीतून एकच बाजू महाराष्ट्रासमोर जात आहे. (Gopichand Padalkar) मारकडवाडीतील लोकांना बॅलेट पेपरवर मतदान हव आहे, असं त्यातून सांगितलं जातंय. मात्र, खरंच इथल्या लोकांना बॅलेट पेपरवर मतदान हवं आहे का? माविआला कोणी मतदान केलंय का? हे सर्वांना कळलं पाहिजे, म्हणून आम्ही मारकडवाडीत आलोत असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. ते मारकडवाडीत बोलत होते.

आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तर नागडं करून मारू; भाजपच्या राम सातपुतेंचं आक्रमक भाषण

हे मारकडवाडी सर्वप्रथम कुणाल दिसलं. हे गाव माझ्या पै-पाहुण्यांचं गाव आहे. 90 टक्के येथे धनगर समाज राहतो. म्हणून माझी जबाबदारी वाढली आणि लक्षात आलं की इथे धनगरांनाच पुढं का करण्यात आलं? म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या प्रक्रियेतून जी निवडणूक पार पडते त्याच्या विरोधात आहे, असं वातावरण निर्माण करण्याचं महापाप शरद पवार यांनी केला आहे. म्हणून आज आम्ही मारकडवाडी मध्ये आलोत असंही पडळकरत म्हणालेत.

100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले आहेत. यांचं डोकं बघा, धनगर समाज लोकशाही मनात नाही, असं भासवण्यात आलंय. या विधानसभेत 100 गाव असताना नेमकं माझ्याच मारकडवाडीला कां पुढे करण्यात आलं? हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आज सदाभाऊ खोत आणि मी या तुमच्या गावात आलो. त्याचबरोबर त्यांनी शरद पवारांवरही घणाघाती टीका केली आहे.

नातवाचा राजीनामा घेतला पाहिजे

जे संसद भवन, राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये डौलाने उभं आहे त्याच्या निर्मितीत धनगर समाजाचं योगदान आहे. ज्या जमिनी आहे त्या होळकरांच्या रायसोनी गावातल्या आहेत. लोकशाही मजबूत करण्यासाठी होळकरांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणुन शरद पवारांचा डाव उधळून टाकण्यासाठी मी आज या गावात आलो आहे. जर काही घडलं असेल तर शरद पवारांनी आपल्या लेकीचा, आपल्या नातवाचा पहिले राजीनामा घेतला पाहिजे असा घणाघातही त्यांनी केला आहे.

जयंत पाटील येथे येऊन गेले त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या तिघांचा पहिल्यांदा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यानंतर हे आंदोलन पुढे नेले पाहिजे. असंही गोपीचंद पडळकर म्हणाले. तसंच, राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनीही राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. तुम्ही केवळ बळीचे बकरे आम्हालाच करत आहात. म्हणून राज्यातील प्रस्थापितांना आपल्याला उधळून लावावे लागेल असेही ते म्हणले.

follow us