Download App

Maharashtra Governor : पदमुक्त होऊ पाहणारे भगतसिंह कोश्यारी यामुळे आले होते चर्चेत

पुणे: भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन दूर करावं, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राज्यभरात विरोधकांनी रान उठवलं होतं.छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी विरोधकांनी राज्यपालांची मागणी केली होती. त्यातच आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वादात सापडण्याचे ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी मुंबईत, महाराष्ट्र, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले इत्यादींवर वादग्रस्त वक्तव्य केलंय. तसंच, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना, राज्यपाल कोश्यारींवर ‘समांतर सरकार’ चालवत असल्याचाही आरोप झाला. राज्यपालांची आतापर्यंत वादग्रस्त वक्तव्य आणि समातंर सरकार चालवत असल्याचा आरोप देखील होत होता.

https://www.youtube.com/watch?v=IoWA0j4sWF0

सर्वप्रथम राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी आतापर्यंत कुठली वादग्रस्त वक्तव्य

1) ‘गुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही’
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 29 जुलै 2022 रोजी मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील दाऊद बाग जंक्शन चौकाच्या नामकरण सोहळ्याला हजेरी लावली होती. या चौकाचं नामकरण दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी चौक असं करण्यात आलं. यावेळी त्यांनी मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढताना मुंबई-ठाण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.

2) ‘समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’
समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारणार? असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यपाल कोश्यारी काही दिवसांपूर्वी अडचणीत आले होते. “चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारणार? समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारणार? गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं, तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे, असं समर्थांना म्हटलं,” अशा आशयाचं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे. पण नंतर या वादावर स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.

3) “महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान”
भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत हसत हसत केलेल्या एका वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता. त्यावेळी कोश्यारी म्हणाले होते की, “कल्पना करा की सावित्री बाईंचं लग्न 10 वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतिचं वय हे 13 वर्ष होतं. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असणार? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? एक प्रकारे तो कालखंड मूर्तीच्या पुढे फुलं वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असं वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

4) ‘नेहरूंच्या ‘शांतीदूत’ प्रतिमेमुळे भारत कमकुवत’
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला,” असं विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. पंडित नेहरूंबद्दल बोलताना कोश्यारी म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत असं त्यांना नेहमी वाटायचं. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. पण त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू होतं.

5) ‘शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श’
आताचा ताजा वाद म्हणजे कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्य. कोश्यारी हे 19 नोव्हेंबर 2022 रोजी औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात सहभागी झाले होते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना डीलिट ही पदवी देऊन गौरवण्यात आले. या दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Tags

follow us