Anil Deshmukh : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खटला चालवण्यासाठी राज्यपालांकडून ईडीला मंजुरी मिळाली आहे. राज्यपालांकडून मंजुरी मिळाल्याने या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यपालांकडून मिळालेल्या मंजुरीनंतर बार आणि रेस्टॉरंटमधून कथित खंडणी वसुलीशी संबंधित पीएमएलए प्रकरणातील न्यायालीन प्रक्रियेला गती मिळणार आहे. तर दुसरीकडे एनआयने परमबीर सिंगला आरोपी का केले नाही ? असा सवाल अनिल देशमुख यांनी विचारला आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीने सोमवारी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात ईडीने यासंदर्भातील पत्र सादर केले होते. राज्यपालांनी 21 मे 2026 रोजी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर खटला चालवण्यासाठी आवश्यक मंजुरी दिली असल्याची माहिती ईडीचे विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी दिली तसेच याबाबत अधिकृत पत्रही त्यांनी न्यायालयात सादर केले. या पत्रात मनी लॉन्ड्रिंग (Money laundering case) प्रतिबंधक कायदा अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात पुढील न्यायालयीन कारवाईसाठी आवश्यक असलेली परवानगी राज्यपालांकडून मिळाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे एनआयएने परमबीर सिंगला (Param Bir Singh) आरोपी का केले नाही ? असा सवाल अनिल देशमुख यांनी विचारला आहे. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या घरासमोर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाचा मास्टरमाईंड तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग असल्याचे ATS तपासात पुढे आले होते. त्यामुळेच मी त्याची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून दुय्यम पदावर बदली केली होती. त्यानंतर परमबीर सिंगने सूडभावनेणे माझ्यावर 100 कोटीचा खोटा आरोप केला. पुढे हा तपास NIA कडे हस्तांतरित केला गेला.
NIA च्या तपासातही परमबीर हाच या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे पुढे आले होते. हे कटकारस्थान परमबीर सिंग यांच्याच कार्यालयात शिजले होते. मुंबई कमिशनर ऑफिसमधील अनेकांच्या जबाबातही हे पुढे आले आहे. या विषयातील एका आरोपीचा जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांनी परमबीर सिंग याला आरोपी का केले नाही म्हणत NIA वर ताशेरे ओढले होते. एवढे सगळे असूनही NIA ने परमबीर सिंगला आरोपी का केले नाही? असं त्यांनी एक्सवर म्हटले आहे.
शेवगावकरांना एक दिवसाला पाणीपुरवठा होणार…
श्री मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या घरासमोर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाचा मास्टरमाईंड तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग असल्याचे #ATS तपासात पुढे आले होते. त्यामुळेच मी त्याची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून दुय्यम पदावर बदली केली होती. त्यानंतर परमबीर सिंगने… pic.twitter.com/u8PYxZmT45
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 4, 2026
नेमकं प्रकरण काय?
2021 मध्ये मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहितं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पत्रात त्यांनी दावा केला होता की, अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतर काही पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील बार, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांकडून दरमहा तब्बल 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या या आरोपांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती.
Chandipura Virus आतापर्यंत 22 मुलांचा मृत्यू, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
