Arun Munde : शेवगावकरांना एक दिवसाला पाणीपुरवठा होणार…

Arun Munde : धरण उशाला कोरड घशाला अशीच काहीशी अवस्था शेवगाव शहराची झाली आहे. महिन्याभरात दोन वेळेस किंवा जास्तीत जास्त तीन वेळेस

Arun Munde

Arun Munde : धरण उशाला कोरड घशाला अशीच काहीशी अवस्था शेवगाव शहराची झाली आहे. महिन्याभरात दोन वेळेस किंवा जास्तीत जास्त तीन वेळेस पाणी पुरवठा होत असल्याने त्रासलेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर असून नागरिकांची मागणीनुसार तीन-चार दिवसातून एकदा नव्हे तर दर दिवसाला पाणीपुरवठा शेवगावकरांना मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असा विश्वास यावेळी अरुण मुंडे यांनी व्यक्त केला.

पाणी प्रश्नावर बोलताना मुंडे (Arun Munde) म्हणाले योजनेतील त्रुटी ज्या होत्या त्यामध्ये सुधारणा करून योग्य योजना आपल्याला राबवायचे आहे या योजनेतील जो सल्लागार होता त्याला बदलण्यात आलेले आहे. पाणी योजनेसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी देखील शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. तसेच शेवगावकरांना दररोज पाणी पुरवठा होईल अशा प्रकारची पाणी योजनेचे कामकाज आमच्याकडून सुरू आहे असा दावा यावेळी मुंडे यांनी व्यक्त केला.

तसेच यावेळी नगराध्यक्ष माया मुंडे (Maya Munde) म्हणाल्या पाणी प्रश्नाचे कामकाज युद्धपातळीवर सुरू असून शेवगाव शहरातील जवाड्या बसत्या या कामापासून वंचित राहिल्या होत्या त्या ठिकाणी देखील पाईपलाईन टाकण्यात आली असून येणाऱ्या वर्षभरामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा आमचा मानस असून त्यासाठी आमच्याकडून प्रयत्न देखील सुरू असल्याचं यावेळी नगराध्यक्ष म्हणाल्या. शेवगाव नगर परिषदेचे कार्यालय मध्यवर्ती भागात स्थलांतरित करण्यात आले. मात्र यावेळी नगरसेवकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसले मात्र राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी मंचावर होते. दरम्यान नागरिकांचा ज्वलंत पाणी प्रश्नावर शिवसेनेचे नेते अरुण मुंडे यांनी विरोधकांना टोला लगावतच शेवगावकरांचा पाणी प्रश्न कधी सुटणार यावरती मोठे भाष्य केले आहे.

Chandipura Virus आतापर्यंत 22 मुलांचा मृत्यू, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

नगरसेवकांना हवी ठेकेदारी… मुंडे यांचा विरोध

शेवगाव शहरातील नगरसेवकांना विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला तसेच निधीचे वाटप देखील करण्यात आले मात्र प्रभागातील विकास कामांची ठेकेदारी ही नगरसेवकांना हवी आहे मात्र आपला या गोष्टीला विरोध आहे नगरसेवकांनी स्वतः ठेकेदारी करू नये जे सुशिक्षित इंजिनियर असतील ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनाही कामे द्यावी असं परखड मत यावेळी मुंडे यांनी व्यक्त केलं. दरम्यान या गोष्टीची नगरसेवकांची नाराजी स्थलांतरित कार्यालयाच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती हे दर्शवित होती.

follow us