Manoj Jarange Patil Narayangad : मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज बीड जिल्ह्यातील नारायणगड येते झालेल्या दसरा मेळाव्यामधून मराठा आरक्षणावरून राज्यातील महायुती सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे. मागच्या १४ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. पण सरकारने एकही मागणी मान्य केलेली नाही. आता सरकारला सुट्टी नाही. सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले आहेत.
आता आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची. मात्र, सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर, सरकारच्या नाकावर टिच्चून सरकारला उलटपालटं केल्याशिवाय मागे हटणार नाही. तसंच आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करेन. तेव्हा मी जे सांगेन ते तुम्ही ऐकायचं, असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित मराठा समाजाला केलं आहे.
Dasara Melava LIVE : मी कुणाला घाबरत नाही, आपल्याला आपला डाव खेळाचाय : पंकजा मुंडे
यावेळी उपस्थित मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, या ताकदीनं आपण एकत्र येणार असं वाटलं नव्हतं. दु:खातून सुखाकडे जायचं आहे. या समुदायावर संस्कार आहेत, त्यामुळे हा समुदाय कधीच जातीयवाद करू शकत नाही. संपूर्ण राज्यभर पसरलाय. पण कधी मस्तीत आणि मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचं प्रत्येकाला साथ देण्याचं काम या समुदायानं केलंय असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
एवढा जनसमुदाय पहिल्यांदाच बघतोय. काय बोलावं ते सूचत नाही आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय आलाय की की, तुमच्या चरणावर खरंच नतमस्तक व्हायला पाहिजे. जातीवाद न करण्याची शिकवण या नारायणगडाने राज्याला देशाला दिलीय. या गडाच्या आशीर्वाद ज्याच्या पाठीवर पडतो तो दिल्लीसुद्धा वाकवतो, असे जरांगे पाटील म्हणाले आत. दरम्यान, आचारसंहिता लागेपर्यंत सरकारने काही निर्णय घेताल नाही तर जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.