Dasara Melava LIVE : मी कुणाला घाबरत नाही, आता आपल्याला आपला डाव खेळाचाय : पंकजा मुंडे

  • Written By: Published:
Dasara Melava LIVE : मी कुणाला घाबरत नाही, आता आपल्याला आपला डाव खेळाचाय : पंकजा मुंडे

Dasara Melava LIVE : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, आज (दि.12) राज्यात राजकीय दसरा मेळाव्यांचे सोने लुटले जाणार आहे. नारायण गडावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा, तर, भगवान गडावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) तर, दुसरीकडे संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. या सर्व राजकीय दसरा मेळाव्याचा रिअल टाईम अपडेट देणार लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग…

LIVE NEWS & UPDATES

  • 12 Oct 2024 02:45 PM (IST)

    आपल्याला आपला डाव खेळायचाय - पंकजा मुंडे

    उपस्थितांना संबोधित करताना पंकजा म्हणाल्या की, मी कुणाला घाबरत नसून, माझं भाषण ऐकायला आलेल्यांना मी घाबरते असे म्हणत. आपल्याला आपला डाव खेळायचा असल्याचे पंकजा म्हणाल्या.  तुम्ही मला जिंकवून इज्जत दिली. माझा पराभव झाल्यानंतर त्याहून इज्जत दिली मी हरल्यामुळे  अजितबात नाराज नाही. उसतोड कामगारांचे जीवन बदलल्याशिवाय शेवटचा श्वास घेणार नाही असे म्हणत मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणार असल्याचे पंकजा म्हणाल्या.

  • 12 Oct 2024 02:41 PM (IST)

    लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू- पंकजा मुंडे

    माझ्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा या लोकांनी जीव दिल्याचे म्हणत इथल्या लोकांवर मी पोटच्या लेकरापेक्षा जीव लावते, आणि आई वडिलांपेक्षा जास्त तुम्ही माझ्यावर प्रेमा करता असे म्हणत लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू असल्याचे पंकजा म्हणाल्या. माझ्या दसऱ्या मेळाव्याला कोणाला मी निमंत्रण देत नाही, पण जे सन्मान करून इथं आले त्यांचं मी इथे मनापासून  स्वागत करते असे पंकजा म्हणाल्या. येथे आलेले 18 जातीचे बांधव तुम्हाला मी दरवर्षी साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या वडिलांनी मरताना माझ्या झोळीमध्ये तुमची जबाबदारी टाकली असल्याचे पंकजा म्हणाल्या.

  • 12 Oct 2024 02:31 PM (IST)

    हिंदीतून कविता म्हणत पंकजांनी केली भाषणाला सुरूवात

    मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू, हिंदीतून कविता म्हणत पंकजा मुंडे यांची भाषणाला सुरुवात केली. यावेळी पंकजा म्हणाल्या की, माझा मुलगा आर्यमानपेक्षा ही जनता मला जास्त प्रिय आहे. पोटच्या लेकरापेक्षा मी तुमच्यावर माया करते.

  • 12 Oct 2024 02:24 PM (IST)

    मी वेगळा दसरा घेण्याचा कधीही विचार केला नाही, कारण...

    बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी आपण भारावून गेल्याचे म्हटले. पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यानंतर भगिनी पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली. याचा मला अभिमान असल्याचेही मुंडे म्हणाले.

    अनेक वेळा संकटाच्या काळात गोपीनाथ मुंडे साहेबांपासून पंकजा मुंडेपर्यंत तुम्ही माझ्या बहिणीच्या पाठीमागे उभे राहिलात. अनेक संघर्षात तुम्ही मेळावा केला, सोबत कोण आहे बघितलं नाही. भाऊ आहे की नाही हे पाहिलं नाही. जरी 12 वर्ष आपलं पटलं नाही. तरी मी वेगळा मेळावा करण्याचा विचार मनात आणला नाही. कारण ज्याला जो वारसा दिला आहे, त्यानेच तो चालवावा असे मुंडे म्हणाले.

    संघर्षाच्या काळात आपण एक राहणं गरजेचं असल्याचे आवाहनही धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले. बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी आपण भारावून गेलो आहे. पंकजा मुंडेंनी खूप संघर्ष केला आहे. या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नाही. पण तरीही सांगतो. आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत. 'तुम लाख कोशिश करो हमे हराने की हम जब जब बिखरेंगे दुगुनी रफ्तारसे निखरेंगे' 

     

  • 12 Oct 2024 02:20 PM (IST)

    आचारसंहिता लागायच्या आत सगळ्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा...

    दसरा मेळाव्याला मार्गदर्शन करताना जरांगेंनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला. ते म्हणाले की, आचारसंहिता लागायच्या आत सगळ्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा सरकार उलथवून टाकायला हा समाज मागे पाहणार नाही. इथून मला सर्वकाही सांगता येणार नाही. आता सर्व जवळ आलंय. त्यांनी सर्व केल्याशिवाय आपला निर्णय घ्यायचा नाही असे म्हणत आचारसंहिता लागल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करणार  असे जरांगे म्हणाले. तुमची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. तुमचा मान, शान, लेकरं सुखी करण्याची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली असल्याचेही जरांगेनी सांगितले.

  • 12 Oct 2024 02:15 PM (IST)

    जाताना आनंद घेऊन जा आणि दु:ख माझ्याकडे देऊन जा - जरांगे 

    अन्यायाविरोधात लढायला हिंदू धर्माने शिकवलं. कायद्याने आणि संविधानाने शिकवलं, अन्याय सहन करायचा नाही. अन्याय होत असेल तर न्यायासाठी लढायचं हे शिकवलं आहे, असे म्हणत मनोज जरांगेंनी उपस्थितांना जाताना आनंद घेऊन जा आणि दु:ख माझ्याकडे देऊन जा असे आवाहन केले. वेळप्रसंगी मरण पत्करेल पण तुमची मान खाली घालू देणार नाही असा विश्वासही जरांगेंनी दिला.

  • 12 Oct 2024 02:06 PM (IST)

    जरांगेंची पवारांवर टीका

    काहीजण पावसात भिजतात ते कशासाठी भिजतात मात्र, आपण जातीसाठी भिजू असे म्हणत मनोज जरांगे यांनी शरद पवारांचे नाव न घेता टीका केली. मी ओरिजनल भक्त, ड्युप्लीकेट भक्त तिकडे आहेत. बुडबुडे फार दिवस टिकत नाहीत. आपण चालत राहायचं, तुमची लेकरं मोठी व्हावीत म्हणून मी सहन करतोय असे म्हणत जरांगेंनी पंकजा मुंडे यांना लगावला.

  • 12 Oct 2024 02:03 PM (IST)

    मराठा समाज कधीच मस्तीत आणि मग्रुरीत वागत नाही

    मराठा समाजवर संस्कार आहेत. ते संस्कार कधीच जातीवाद करत नाहीत. हा समाज कधीच मस्तीत आणि मग्रुरीत वागत नाही. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय राज्यात समुद्रासारखा पसरला आहे.

  • 12 Oct 2024 01:58 PM (IST)

    नारायण गडाचा आशीर्वाद दिल्लीही वाकवतो - जरांगे

    नारायण गडानं जातीवाद न करण्याची शिकवण या गडाने दिली आहे. वारकरी संप्रदायाची शिकवण या गडाने दिली आहे. या गडाची महिमा, किमया आणि आशीर्वाद ज्याच्या ज्याच्या पाठिवर पडतो तो दिल्लीही वाकवतो असा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube