Download App

Gram Panchayat Election Result वर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Gram Panchayat Election Result : आज (दि.6) हाती येणाऱ्या 2 हजार 300 ग्रामपंचायतींच्या निकालाकडे (Maharashtra Gram panchayat Election Result) सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी झालेल्या या निवडणुका स्थानिक पातळळीवर महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यात आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यातील प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

ग्रामपंचायतींच्या निकालावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला आहे. हे महायुतीवरील मतदारांचं प्रेम आहे, मतदारांचा विश्वास आहे. मी जनतेला धन्यवाद देतो. शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत, तसेच महिलांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं.

राजधानी दिल्लीत जोरदार भुकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 5.6 तीव्रतेची नोंद; नागरिकांमध्ये घबराहट

तसेच ते पुढे म्हणाले की, शासन सर्वांच्या दारी पोहोचलं आहे. आणखी जोमाने आम्ही काम करु. तरुणांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचं जे धोरण आम्ही आखलंय त्याला आम्ही चालना देऊ. सर्व समाजाने आम्हाला पाठबळ दिलं, आशिर्वाद दिला. घरी बसून राज्य चालवता येत नाही, हे लोकांनी दाखवून दिलं. कामाचा वेग आम्ही वाढवलाय, अशीच आमची घोडदौड सुरु राहील.

फडणवीसांना टिकेचा धनी बनवणाऱ्यांना चपराक; ग्रामपंचायतीत दणदणीत विजयानंतर भाजपची प्रतिक्रिया

येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुतीचं यश कायम राहील आगामी लोकसभेच्या निवडणुकीत 45 प्लस जागा राज्यातून आम्ही देऊ, मोदी साहेबांचे हात बळकट करु. तर मोदींना पंतप्रधान करण्यासाठी देशाच्या जनतेने निर्णय घेतलेला आहे. असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Tags

follow us