फडणवीसांना टिकेचा धनी बनवणाऱ्यांना चपराक; ग्रामपंचायतीत दणदणीत विजयानंतर भाजपची प्रतिक्रिया
मुंबई : राज्यात काल (दि.5) पार पडलेल्या 2 हजार 359 ग्रामपंचायतींचे निकाल आज (दि. 6) समोर आले असून, भाजपनं सातशेहून अधिक ग्रामपंचायतींवर कमळ फुलवले आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी भाजपसाठी हा विजय मोठा मानला जात आहे. या मोठ्या विजयानंतर आता भाजपकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, विविध मुद्द्यांवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टीकेचे धनी बनवणाऱ्यांना आजचा विजय म्हमजे खणखणीत चपराक असल्याचे भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटले आहे. (Pravjn Darekar Reaction On Maharashtra Gram Panchayat Election)
Gram Panchayat Election Result :बीआरएसचा एंट्री, दहा ग्रामपंचायती घेतल्या ताब्यात
दरेकर म्हणाले की, भाजपनं राज्यातील साडेसातशे एवढ्या जागा जिंकून दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे. आजच्या निकालात अजितदादा गट आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसनेने विजय मिळवला आहे. तिघांची एकत्रित बेरीज केल्यास राज्यातील ग्रामपंचायतीतील जवळपास 70 टक्के जागा काबीज केल्या आहेत. भाजपसाठी राज्यातील आजचा विजय हा स्विप असल्याचेही दरेकर म्हणाले.
गेल्या आठवडा भरातील राज्यात घडलेल्या घडामोडींवरून भाजपला काही हितशत्रूंकडून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर, फडणवीसांवर टीका टिप्पणी करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे, फडणवीस यांनी या गोष्टींना कधीही प्रतिकार केला नाही. तर, उलटं त्यांच्याकडून आम्ही काम करणारी आणि विकासाचं राजकारण करणारी लोकं आहोत हेच सातत्याने सांगितले.
अजितदादांच्या गावात भाजपचा चंचू प्रवेश : काटेवाडीच्या ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच ‘फुललं कमळ’
आजच्या निकालावरून संपूर्ण ग्रामीण भाग हा भाजपच्या बाजूने असल्याचे पुन्हा एकदा आधोरेखित झाले आहे. लोकांना सुडाच्या, टिकेच्या राजकारणाऐवजी विकासाचं राजकारण आवडतं हाच संदेश महाराष्ट्रातील जनतेने दिला आहे. कारण स्वतः पंतप्रधान मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे विकासाच्या मुद्द्यावर बोलतात. तर, अजितदादा विकासाभिमुख काम करतात. त्यामुळे जनतेला भावनिक गोष्टींपेक्षा विकासाचं राजकारण हवं असल्याचा टोला दरेकर यांनी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरेंना लगावला आहे. हे राजकाण आमची महायुती करू शकते आणि यावर राज्यातील जनतेचे प्रचंड विश्वासाने शिक्कामोर्तब केले आहे असा दावाही दरेकरांनी यावेळी केला.