letsupp.com चे शानदार उद्घाटन, महाराष्ट्रभर ठसा उमटविण्यास सज्ज

अहमदनगरः तुमचं लाडकं लेट्सअप आता नव्या स्वरूपात येत आहे. आमचा नवीन पत्ता Letsupp.com असा असणार आहे. या पत्त्यावर आता तुम्हाला राजकारणाची बित्तंबातमी, रंजन आणि माहितीपर मुलाखती, मनोरंजनाचा खजिना, स्पोर्ट्सचा धमाका, लाइफस्टाइलचा सल्ला असे सारे येथे मिळणार आहे. लेट्सअपची ही नवीन वेबसाइट संक्रांतीच्या मुहूर्तावर आपल्या भेटीसाठी आली आहे. या वेबसाइटचे उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि अन्य […]

Letsupp Logo

Letsupp Logo

अहमदनगरः तुमचं लाडकं लेट्सअप आता नव्या स्वरूपात येत आहे. आमचा नवीन पत्ता Letsupp.com असा असणार आहे. या पत्त्यावर आता तुम्हाला राजकारणाची बित्तंबातमी, रंजन आणि माहितीपर मुलाखती, मनोरंजनाचा खजिना, स्पोर्ट्सचा धमाका, लाइफस्टाइलचा सल्ला असे सारे येथे मिळणार आहे. लेट्सअपची ही नवीन वेबसाइट संक्रांतीच्या मुहूर्तावर आपल्या भेटीसाठी आली आहे.

या वेबसाइटचे उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थित आज अहमदनगर येथे पार पडले. महाराष्ट्रात अनेक वेबसाइट असल्या तरी Letsupp.com अल्पवधीतच आपला ठसा उमटवेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या संकल्पनेतून 2015 साली लेट्सअपचा जन्म झाला. सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून वाचकांना जोडण्याचा मानस होता. त्यानुसार महाराष्ट्रातील जवळपास लाखो लोकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जोडण्यात आले. यानंतर लोकआग्रहास्तव लेट्सअपने अ‍ॅपद्वारे लोकांना अपडेट ठेवण्याचे काम केले आहे.

आता बदलत्या काळासोबत बदलण्यासाठी लेट्सअपने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने लेट्सअपचा फिल घेता यावा, यासाठी लेट्सअप घेऊन आलंय वेबसाईट. लेट्सअपला आत्तापर्यंत दिलेले भर-भरून प्रेम असेच असू द्या, ते वृद्धिंगत व्हावे. त्यासाठी आपण लेट्सअपचे फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डल, इन्स्टाग्राम पेज, यूट्यूब चॅनेल फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.

Exit mobile version