कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही! ‘मुंबईला धमकी, गणेशोत्सवात आंदोलन का? गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर निशाणा

Sadavarte Attacks Jarange Hunger Strike In Mumbai : मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा करताच वकील सदावर्ते यांनी टीका केली आहे.

News Photo   2026 09 12T194955.825

Gunratna Sadavarte attacks Manoj Jarange's hunger strike in Mumbai

Sadavarte Attacks Jarange Hunger Strike In Mumbai : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Jarange) यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 15 वा दिवस असून, अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जरांगे यांनी आंदोलन मुंबईत नेण्याची घोषणा केली. येत्या 15 सप्टेंबरला मराठा बांधव अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून, आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.

दरम्यान, जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या घोषणेनंतर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला. सणासुदीच्या काळात मुंबईवर विघ्न आणलं जात असताना राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत गप्प का आहेत, असा सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केला. आंदोलनामुळं विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावं लागलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

जरांगेंच्या मुंबई मोर्चाच्या घोषणेनंतर बारस्कर आक्रमक; ‘हे आंदोलन इमेज ब्रँडिंगसाठी’

गणेशोत्सवाच्या काळातच आंदोलनाची निवड करण्यात आली असून गणेशभक्त याला माफ करणार नाहीत, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला. यासोबतच त्यांनी विरोधी पक्षांवरही टीका केली. जरांगे यांच्या आंदोलनाला एवढी ताकद कुठून मिळतं, असा सवाल करत छुपे राजकारण करू नका, असं आवाहन त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केलं. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून जरांगे यांची भूमिका कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, जरांगे यांचे मुंबईतील आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या घराला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला. आझाद मैदानावरील आंदोलनाच्या वेळेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, हे स्पष्ट झालं पाहिजे, असं म्हटलं. जरांगे यांच्या आंदोलनासह या संपूर्ण प्रकरणातील बाबी न्यायालयासमोर मांडणार असल्याचे सदावर्ते यांनी सांगितलं.

Exit mobile version