मोठी बातमी ! सर्वच मराठे कुणबी होऊ शकत नाही; मराठा क्रांती मोर्चाची जरांगेंच्या विरोधात भूमिका

Maratha Reservation : राज्यातील सर्वच मराठा समाज कुणबी होण्यामध्ये काही अडथळे आहेत व सर्वच मराठा कुणबी होऊ शकत नाही.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Maratha Kranti Morcha

Maratha Reservation : मराठा समाजाला सरसकट कुणबी (Kunbis) प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे उपोषण सुरू आहे. उद्यापासून मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा जरांगे यांनी केलीय. परंतु मराठा क्रांती मोर्चाने जरांगे यांच्यापेक्षा वेगळी भूमिका जाहीर केलीय. राज्यातील सर्वच मराठा समाज कुणबी होण्यामध्ये काही अडथळे आहेत व सर्वच मराठा कुणबी होऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) पुण्यातील पत्रकार परिषदेत घेतलीय.

SEBC आरक्षण टिकणार नाही असा एक प्रवाह महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून सर्वच मराठ्यांच्या समावेश ओबीसीमध्ये कुणबी म्हणून झाला पाहिजे अशी मागणी पुढे येत आहे. मात्र राज्यातील सर्वच मराठा समाज कुणबी होण्यामध्ये काही अडथळे आहेत व सर्वच मराठा कुणबी होऊ शकत नाही. एकदा कुणबी जात पडताळणी झालेली व्यक्ती पुन्हा मराठा होऊ शकत नाही. एकाच वेळेस कुणबी व मराठा दोन्ही पडताळणी एकाच व्यक्तीस मिळू शकत नाही. त्यामुळे राज्यातील दोन समूहामधे निर्माण झालेले टोकदार वाद संपुष्टात आणण्यासाठी सर्व प्रकारच्या आरक्षणाची आणि न्यायालयीन बाबींची माहिती देणारी श्वेतपत्रिका जनतेपुढे मांडली पाहिजे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाची आहे. मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब जगताप, अनिल लांडगे, राजेंद्र कोंढरे, प्रशांत कुंजीर, किशोर मोरे, जगजीवन काळे, संतोष आतिकर, राकेश गायकवाड, सुनिल डाळपुंगे, सचिन शिंदे यांनी भूमिका मांडलीय.


’10 दिवस दारू नाही तर, रुग्णालयं भरतील’; पुण्याच्या दारूबंदीवर HC ची मिश्किल टिप्पणी


महाराष्ट्र पेटण्याची वाट पाहता का ?

घटनात्मक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे विविध निर्णय दुर्लक्षित करून करत असलेले कायदे आणि वेळोवेळी काढत असलेल्या उलट सुलट शासन निर्णयामुळे आरक्षण विषयात विविध जाती समूहात, मराठा व ओबीसी समूहात पसरविलेले समज गैरसमज त्यातच शासन व विरोधी पक्ष यात घेत असलेली दुहेरी भूमिका यातून राज्यात निर्माण होत असलेली अशांतता पाहता शासनाने वस्तुनिष्ठ माहिती समोर ठेवा. अन्यथा महाराष्ट्र पेटण्याची वाट पाहणार का ? महाराष्ट्र राज्य गेले दोन दशके कोणत्या ना कोणत्या आरक्षणाच्या वरून वेळोवेळी अशांत होत आहे. शासन राजकीय पक्ष संघटना विविध समाजाचे नेते यांनी घेतलेल्या एकमेकांच्या विरोधी घेतलेल्या वादग्रस्त भूमिका यामुळे आरक्षण या विषयाचा विचका तर झालेला आहेच आणि महाराष्ट्र समाज एकमेकांकडे संशयी भूमिकेने पाहत आहेत यामुळे महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवत चालली आहे, असा मराठा क्रांती मोर्चाचे म्हणणे आहे.

सध्या राज्यात 58 लाख नोंदींवरून मराठा समाज पूर्णपणे ओबीसीचे आरक्षण घेईल. मराठा समाजाला मोठ्या संख्येने कुणबी प्रमाणपत्र दिल्यावर ओबीसी समूहातील काही नेते आमचे राजकीय आरक्षण व शैक्षणिक आरक्षण मराठा समाजाने खाल्ले आहे. असा प्रचार केल्याने मराठा व ओबीसी समूहात दोन्ही बाजूनी सुरु असलेल्या प्रतिक्रिया यामुळे काही प्रमाणात तणाव आणि गैरसमज निर्माण झालेले आहे, असे मराठा क्रांती मोर्चाची भूमिका आहे.


श्वानाला फिरवण्यासाठी स्टेडियम रिकामं केल्याचं प्रकरण; IAS अधिकारी रिंकू दुग्गा यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

1967 पासून कुणबी ही जात, वर्ग इतर मागासवर्गाच्या यादीत आहेत. हे आरक्षण म्हणजे सोशली SOCIALLY EDUCATIONALLY BACKWARD CLASSES OF CITIZEN म्हणजे हे आरक्षण वर्गाला असून वर्ग शोधण्याकरिता आपल्याकडे जातिव्यवस्था ही व्यवसायावर आधारित आहे. त्या न्यायाने त्यामुळे जो कपडे शिवतो तो शिंपी ,जो बागकाम व शेती करतो तो माळी,जो बकऱ्यांचे कळप घेऊन भटकंती करतो भटका या दृष्टीने असा वर्ग असल्याने व्यवसाय आधारित जाती चा समावेश ओबीसी प्रवर्गात असल्याने शेती करणाऱ्या अनेक जाती ओबीसी प्रवर्गात आहेत तर शेती करणारा कुणबी हा सुद्धा एक वर्ग आहे. 58 लाख नोंदी वरून संपूर्ण मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसी होणार आहे का हा कळीचा मुद्दा सद्य गाजत आहे.

न्या. शिंदे समितीने ह्या नोंदी कशा शोधल्या व कशा मोजल्या आणि ज्या नोंदी मोजल्या त्यावरून अगोदर किती प्रमाणपत्र दिली ? की दिली नव्हती ? याची स्पष्टता शासनाने पूर्ण प्रक्रिया समजून न सांगितल्याने मराठा समाजाला 58 लाख गुणिले 4 सव्वा दोन कोटी समाज ओबीसीत जाईल असा समज निर्माण झालाय आणि त्यामुळे ओबीसी समूहाला भीती निर्माण झाली आहे. वास्तविक ज्या जुन्या नोंदी कुणबी सापडतात. त्यात मराठा कुणबी बरोबरच 48 प्रकारचे कुणबी तत्सम जाती आणि बहुजन समाजातील जे शेती करत होते अशा अनेकांच्या नोंदी पूर्वी कुणबी लागलेल्या आहेत. त्यांचा त्यात समावेश आहे. याचे स्वतंत्र वर्गीकरण उपलब्ध नसल्याने यात मराठा कुणबी व इतर कुणबी असा फरक ओळखण्याचे काम रेकॉर्डवरून झालेले नाही. तसेच या नोंदी मोजताना सर्वसाधारणपणे एखाद्या खापर पणजोबाला जर पाच मुलगे मुलगी झाली असतील तर त्यांना पुन्हा मुलगे मुलगी झाले तर प्लेग च्या साथीत अनेक बालके वारली तरी खापर पणजोबा पासून आज रोजीच्या वंशावळी पर्यंत 10 ते 15 नोंदी असतात. त्यावरून आज रोजी एका कुटुंबात शिकणाऱ्या दोन विद्यार्थी प्रमाणपत्रे घेतात त्यामुळे 58 लाख नोंदीवरून आज रोजी राज्यातील सर्व प्रकारच्या कुणबी दाखल्यांची संख्या 1986 पासून ते आजपर्यंत 60 लाख आहे. यावरून हे लक्षात येईल, असे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

follow us