Download App

मनोज जरांगेंना कुणाची चावी? जरांगेंच्या आरोपानंतर सदावर्तेंनी थेट नावचं घेतलं

  • Written By: Last Updated:

Gunaratna Sadavarte On Manoj Jarange : गेल्या अनेक दिवसांपासून शांततेत आंदोलन करत असलेल्या मनोज जरांग (Manoj Jarange) यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अंतरवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस यांना आपला बळी घ्यायचा आहे, त्यासाठी त्यांनी षडयंत्र रचल्याचं जरांगे म्हणाले. यानंतर जरांगे हे फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. यावर आता वकील गुणरत्न सदावर्त (Gunaratna Sadavarte) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचा मंगळवारपासून थरार ! 

गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. शाळा-कॉलेजच्या परीक्षा सुरू असताना मनोज जरांगे महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जरांगेंनी पुन्हा एकदा ‘हम करे सो कायदा’ अशी भाषा बोलून समाजाला उत्तेजित केलं. अंतरवालीतून अमुकाच्या घरी जातो, तमुकाच्या घरी जातो आणि बघा काय होतं, मी जीव देतो, अशा प्रकारची भाषा करत आहेत. लोकांनी रस्त्यावर याव असा त्यांचा प्रयत्न आहे. याला राष्ट्रवादीचे वयोवृध्द नेते शरद पवार यांची चावी आहे, याची चौकशी झाली पाहिजे, असं सदावर्ते म्हणाले.

रांचीमध्ये टीम इंडियाचा विजय पक्का! कुलदीप-अश्विनसमोर इंग्लंडचं लोटांगण 

पुढं बोलातांना ते म्हणाले, जरांगे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला डिस्टर्ब करून त्रास देत आहे. मुंबई आणि महाराष्ट्राला वेठीस धण्याचा प्रयत्न करतोय, असं सदावर्ते म्हणाले.

जालन्याचे पोलीस अधीक्षक, मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक या तिघांनाही विनंती आहे की, उच्च न्यायालयाचे आदेश लक्षात घेता याची गुन्हेगारी प्रवृत्ती, कृती लक्षात घेता जरांगेला आहे, तिथेच स्थानबध्द करण्यातं यावं, जरांगेंना अटक करण्यात यावी, तो कायद्यापेक्षा मोठा नाही, अशी टीका सदावर्तेंनी केली.

जरांगेंचे आरोप काय?

पाच महिने झाले तरी फडणवीस यांनी आरोप मागे घेतले नाहीत. जर तुम्हाला बळी पाहिजे असेल तर मी माझा बळी देण्यास तयार आहे. देवेंद्र फडणवीस मला मारण्याचा कट रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न आहदे. यामुळे मी सलाईन घेणंचं बंद केलं. नारायण राणे आणि अजय बारस्कर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

follow us

वेब स्टोरीज