रांचीमध्ये टीम इंडियाचा विजय पक्का! कुलदीप-अश्विनसमोर इंग्लंडचं लोटांगण
IND Vs ENG : रांची कसोटीच्या (IND Vs ENG) तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या बिनबाद 40 धावा आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 24 धावा करून नाबाद परतला. यशस्वी जैस्वाल 16 धावावर खेळत आहे. सध्या भारतीय संघाला विजयासाठी 152 धावांची गरज आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ बऱ्यापैकी मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताला रांची कसोटी जिंकून मालिका जिंकायची आहे. सध्या भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.
इंग्लंड संघाला तिसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. पण तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी ज्या प्रकारे इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध धावा केल्या, त्यामुळे बेन स्टोक्सच्या संघाला भारतीय फलंदाजांना रोखणे सोपे जाणार नाही.
Kumar Sahani Passed Away : मायादर्पण आणि कस्बाचे दिग्दर्शक कुमार साहनींच निधन चित्रपटसृष्टीवर शोककळा
इंग्लंडचा दुसरा डाव 145 धावांवर संपला
याआधी इंग्लंडचा दुसरा डाव 145 धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडकडे 46 धावांची आघाडी होती. अशा प्रकारे भारतीय संघासमोर 192 धावांचे लक्ष्य आहे. भारताकडून अश्विन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अश्विनने इंग्लंडच्या 5 फलंदाजांना तंबूत पाठवले. तर कुलदीप यादवने 4 विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाने 1 विकेट आपल्या नावावर केली.
Prajakta Mali : गुलाबो… गुलाबी साडीत प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अंदाज