Anjali Damania on Vaishnavi Hagavane case : वैष्णवी हगवणे प्रकरणात शशांक हगवणे (Hagavane) याचे मामा आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्याकडून आधी अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला. त्यानंतर आता त्यांची महाराष्ट्र होमगार्ड उपमहासमादेशक पदावर बदली करण्यात आली आहे. मात्र, आता जालिंदर सुपेकर यांची बायको सुद्धा अडचणीत सापडणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया त्यांच्याविरोधात थेट पुरावा दिला आहे.
वैष्णवी हगवणे हिचे आत्महत्येचे प्रकरण समोर आल्यानंतर अंजली दमानिया यांनी यापूर्वी अनेक ट्वीट करताना गंभीर आरोप केले होते. अंजली दमानिया यांनी म्हटले की, जालिंदर सुपेकर हे पोलीस महानिरीक्षक असून ते वैष्णवीचे मामा सासरे म्हणजेच शशांक हगवणेचे सख्खे मामा आहेत. त्यांच्याबद्दल मी माहिती घेतली असून हगवणे कुटुंबीय या मामांचा धाक दाखवून दोन्ही सुनांवर अत्याचार करायचे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. यानंतर आता त्यांनी हा घ्या एक मोठा पुरावा म्हणत बँक स्टेटमेंट ट्वीट केले आहे.
धुळ्यात हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती!नवऱ्याकडूनच छळ करून हत्या, पिडीतेच्या नातेवाईकांचा आरोप
अंजली दमानिया यांनी ट्वीट करताना दावा केला की, वैष्णवीच्या वडिलांकडून एक लाख रुपये पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने घेतले गेले. तुम्ही रुखवत नका करू, मामी (पूनम जालिंदर सुपेकर) सुंदर रूखवत करतील, असे सांगून 1 लाखाचा चेक आणि 50,000 रोख रक्कम हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या माहेच्यांकडून वसूल केली. दूरच्या नातलगांना कोणी पैसे द्यायला सांगतात का? असा प्रश्नही अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे आता जालिंदर सुपेकर यांच्या पत्नी पूनम सुपेकर यांचीही वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी होणार का? हे पाहावे लागेल.
हा घ्या एक मोठा पुरावा.
वैष्णवीच्या वडिलांकडून १००००० रुपये पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने घेतले.
तुम्ही रुखवत नका करू, मामी (पूनम जालिंदर सुपेकर) सुंदर रूखवत करतील असे सांगून १ लाखाचा चेक आणि ५०,००० रोख हे हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या महेच्यांकडून वसूल केले.
दूरच्या… pic.twitter.com/Xo6QeSa1LC
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 31, 2025