धुळ्यात हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती!नवऱ्याकडूनच छळ करून हत्या, पिडीतेच्या नातेवाईकांचा आरोप

Repeated Vaishnavai Hagwane case in Dhule Torture and murder by husband, allegation by victim’s relatives : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यात महिलांच्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यातच हाय प्रोफाईल केस असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच धुळे जिल्ह्यामध्ये देखील अशीच घटना घडली आहे. सैन्यात जवान असलेल्या पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. काय आहे हे सर्व प्रकरण जाणून घेऊ…
धुळ्यामध्ये वैष्णवी सारखीच हत्या…
धुळे जिल्ह्यातील वलवाडी या गावामध्ये सैन्य दलामध्ये असलेल्या कपिल बागुल याने पत्नी शारदा हिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या भावाला भडगाव येथे फोन करून सांगितले की, तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. यावेळी तातडीने सर्वजण अंत्यसंस्कारासाठी धुळ्यात आले. यावेळी कपिल बागुल याने. अंत्यसंस्काराची तयारी केली होती. मात्र तेवढ्याच पीडितेचे नातेवाईक आले. त्यामध्ये शाब्दिक वाद झाला. पोलिसांपर्यंत ही सर्व माहिती गेल्याने कारवाईला सुरुवात झाली.
तेव्हा मला पाकिस्तानमधून एका दिवसात किमान पन्नास… अभिनेत्री ममता कुलकर्णीचं मोठ वक्तव्य
दरम्यान 2010 मध्ये कपिल आणि शारदा यांचा विवाह झाला होता. मात्र कपिल हा शारदाचा छळ करत होता. याबाबत जळगाव येथे महिला आयोगाकडे गेल्यावर्षी तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. पण आयोगाने ही बाब गांभीर्याने घेतले नाही. असा आरोप शारदाच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे कपिलला कुठून शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. तर हत्येपूर्वी देखील कपिलने शारदाला मारहाण केली होती. तसेच मुलगी आणि मुलगा यांना संभाजीनगर येथे पाठवून देण्यात आलं होतं. त्यामुळे या दोन्ही मुलांचा ताबा देखील मिळावा. अशी मागणी शारदाच्या माहेरच्यांनी केली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, फरार निलेश चव्हाणच्या नेपाळमधून मुसक्या आवळल्या…
गेल्या काही दिवसांपासून फरार असणारा निलेश चव्हाण (Nilesh Chavan) याला अटक करण्यात आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत नेपाळमधून (Nepal) निलेश चव्हाण याला अटक केली आहे.वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या राज्यात गाजत असून या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagavane), दीर सुशील हगवणे, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. तर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत निलेश चव्हाण याला देखील अटक करण्यात आल्याने आता या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.