हर्षवर्धन पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; अजित पवारांना बोलावून घेत शरद पवार यांनी काय सांगितलं?

शरद पवार यांनी अजित पवार यांना बोलावून घेत एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकीची प्रक्रिया सुरू.

Untitled Design (324)

Untitled Design (324)

Harshvardhan Patil’s big revelation : शरद पवार यांनी अजित पवार यांना बोलावून घेत एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही आणि भरणे मामा एकत्र आलो असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकूण 24 उमेदवार देण्यात येणार आहेत, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

सर्व उमेदवार हे घड्याळ या एकाच निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार असून, दोन्ही पक्षांचे उमेदवार एकत्रितपणे रिंगणात असतील. दोन्ही राष्ट्रवादी वेगळे झाल्यानंतर विकास कुठेतरी खुंटला होता. त्यामुळे कामामध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी हा एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे एकीकरण केवळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीपुरतं मर्यादित नसून, येऊ घातलेल्या 60 ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही दोन्ही गट एकत्रितपणे लढणार आहेत. सर्व ठिकाणी एकमत साधण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, जिथे एकमत होणार नाही, तिथे वरिष्ठ नेते हस्तक्षेप करणार नाहीत, असंही सांगण्यात आलं.

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला…. भिडे गुरुजींचं वादग्रस्त वक्तव्य

उमेदवारांच्या नावांकडे न पाहता केवळ घड्याळ या चिन्हाला मतदान मिळवून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. 5 तारखेला मतदान झाल्यानंतर 28 तारखेला सर्व निवडून आलेले उमेदवार पंचायत समितीत एकत्र येणार असून, यावेळी दोन्ही गटांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावं, असं आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केलं. राजकारण हे समाजकारण असून ते द्वेषाने नव्हे तर विचाराने केलं पाहिजे. तात्पुरत्या फायद्यांपेक्षा दूरदृष्टी ठेवून राजकारण करण्याची गरज आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

Exit mobile version