मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावरच; 227 जागांवर लढणार असल्याचं केलं जाहीर

आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस मुंबईत 227 जागांवर लढणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जाहीर.

Untitled Design (151)

Untitled Design (151)

Congress will contest elections on its own : ठाकरे बंधूंनी काल संयुक्त पत्रकारपरिषद घेत महापालिका निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. त्यानंतर राज्यात अनेक नाट्यमयी घटना पाहायला मिळाल्या. दरम्यान आता काँग्रेसने(Congress) आपली भूमिका स्पष्ट केली असून मुंबई महानगरपालिका(BMC) स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस मुंबईत 227 जागांवर लढणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ(Harshvardhan Sapkal) यांनी जाहीर केलं आहे. ठाकरे बंधूंनी युती केल्यानंतर काँग्रेसने महादेव जानकरांच्या रासपसोबत आघाडी जाहीर केली होती.

राम शिंदेंसाठी थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी कायदाच बदलला; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

यावेळी त्यांनी सांगितलं की, मुंबईत आम्हला ज्या जागांवर लढायचं होत त्याच जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेला देखील लढायचं असल्याने आम्ही वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांचा भावना लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, तुम्ही दरवेळी आघाडी करता, आम्ची लढण्याची इच्छा आहे. आघाडी केल्यामुळे आम्हाला कमी जागा मिळतात. त्यामुळे आमची कोंडी होते. त्या भूमिकेतून आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version