Harshvardhan Sapkal On Devendra Fadnavis : राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचा बिहार करुन दाखवला अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मुंबईच्या लोकलमध्ये 23 जूनच्या रात्री एका 22 वर्षीय तरुणाची हत्या होते तसेच राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना देखील महाराष्ट्र सरकार (Devendra Fadnavis) गप्प बसत आहे असं देखील हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले. त्यांनी राज्य सरकारवर एक्सवर पोस्ट करत हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला!
मुंबईच्या लोकलमध्ये एका मराठी तरुणाची निर्घृण हत्या होते… महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत… खून, दरोडे, टोळीयुद्ध, अमली पदार्थांचे रॅकेट, हिट-अँड-रन आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरत आहे… पुण्यात विषारी दारू प्रकरणात निष्पाप नागरिकांचा बळी जातो… एका जिवंत महिलेला मृत घोषित करून तिच्या वडील आणि भावाला अटक करून मारहाण केली जाते… सरकार मात्र मूग गिळून गप्प बसते…
महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला!
मुंबईच्या लोकलमध्ये एका मराठी तरुणाची निर्घृण हत्या होते… महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत… खून, दरोडे, टोळीयुद्ध, अमली पदार्थांचे रॅकेट, हिट-अँड-रन आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरत आहे…
पुण्यात विषारी… pic.twitter.com/OP7YBAiV1j— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) June 25, 2026
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरपासून ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत कायदा-सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. भरदिवसा हत्या होतात, टोळ्या खुलेआम दहशत माजवतात, ड्रग्ज माफिया राज्यभर जाळं पसरवतात आणि सामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. ज्या महाराष्ट्राने देशाला प्रगतीचा मार्ग दाखवला, त्या महाराष्ट्रात आज नागरिक स्वतःच्या सुरक्षेबाबत साशंक आहेत. ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची घसरण नाही, तर राज्यकर्त्यांचे अपयश आहे.
सत्तेसाठी आमदार फोडा, खासदार फोडा, पक्ष फोडा, विरोधकांना संपवा… पण राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी मात्र सरकारकडे ना इच्छाशक्ती आहे, ना धोरण, ना जबाबदारीची जाणीव! देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची ओळख ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे राज्य म्हणून निर्माण होत आहे. “महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला” हे आता वास्तव बनत आहे.
आता विद्यार्थीही शिकणार आणीबाणीचा इतिहास ; NCERT ने घेतला मोठा निर्णय –
