Manikrao Kokate : आर्थिक उत्पन्नाचे बनावट दस्तावेज प्रकरणात चर्चेत असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठावलेल्या २ वर्षांच्या शिक्षेप्रकरणी आज नाशिकचं सत्र न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. (Kokate) त्यामुळं त्यांची आमदारकी जाणार की राहणार? हे आता पाहावं लागणार आहे. बनावट कागदपत्रांद्वारे सदनिका लाटल्याच्या प्रकरणात ते दोषी ठरले आहेत.
राजीनामा देतानाही धनंजय मुंडेंनी मग्रुरी दाखवली : मनोज जरांगेंचा घणाघात
पण शिक्षेला स्थगिती देण्यात यावी यासाठी कोकाटे यांनी सत्र न्यायालयात अपिल केलं होतं. पण याविरोधात हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात येणार होते. १ मार्चला झालेल्या सुनावणीवेळी माणिकराव कोकाटे यांची शिक्षा स्थगित होऊ नये, यासाठी तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली राठोड आणि शरद शिंदे यांना हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यासाठी ३ दिवसांचा वेळ दिला होता.
नेमकं प्रकरण काय?
आर्थिक उत्पन्नाचे बनावट दस्तावेज तयार करून मुख्यमंत्र्यांच्या १० टक्के राखीव कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांच्या तुरुंगवासाची आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिकच्या सत्र न्यायालयानं सुनावली आहे.