कोणीही नाराज झाले तरी मान्यता देणार नाही, तो माझा अधिकार…; CM फडणवीसांनी कोकाटेंना सुनावलं

Devendra Fadnavis : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसच (Chief Minister Fadnavis) आमचे पीए,ओएसडीसुद्धा ठरवतात.त्यामुळे आता आमच्या पण हातात काहीच राहिलेलं नाही, असं विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री पंकजा मुंडे महाकुंभमेळ्यात, आईसह केलं त्रिवेणी संगमात पवित्र स्नान पाहा फोटो
देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांना कदाचित माहित नसेल की, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच आहे. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात. मुख्यमंत्री त्याबाबत अंतिम निर्णय घेतात. हे काही नव्याने होत नाही. मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितले होतं की, तुम्हाला पाहिजे ती नावे पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावे फिक्सर म्हणून, ज्यांची नावे चुकीच्या कामांमध्ये समाविष्ट आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
ते म्हणाले, आतापर्यंत माझ्याकडे सुमारे १२५ नावे आली आहेत. मी त्यापैकी १०९ नावे क्लिअर केली. उर्वरित नावे मी क्लिअर केली नाहीत. कारण, त्यांच्यावर काही ना काही आरोप आहेत. कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे. किंवा मंत्रायलायत त्यांच्याबद्दल फिक्सर म्हणून पर्सेप्शन आहे. कोणीही नाराज झालं तरीही मी अशांना मान्यता देणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
शेअर बाजारात पुन्हा घसरण, गुंतवणूकदारांचे बुडाले हजारो कोटी, ‘हे’ आहे कारण
धर्मावरून बंदी नाही…
पाथर्डी तालुक्यात असलेल्या मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामस्थांच्यावतीने घेण्यात आला आहे. यावरही फडणवीसांनी भाष्य केलं. कानिफनाथ यात्रेमध्ये व्यावसायिकांवर जातीवरून किंवा धर्मावरून बंदी आणली नाही. जे नियम पाळत नाहीत, त्यांच्यावर बंदी आणली आहे, असं फडणवीस म्हणाले.
मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर होत असलेल्या आरोपांविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, आमच्याकडे कोणीही तक्रार केली तर त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो. सध्या चौकशी सुरू आहे. तक्रार झाली म्हणजे, अनियमितता झाली असं म्हणण्याचं कारण नाही, तक्रारीच्या अंती चौकशीतून काय निघेल त्यावर मी बोलेल, असं फडणवीस म्हणाले.
साहित्यिकांनी पार्टी लाईन्सवर बोलू नये…
गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारलं असता फडणवीस म्हणाले की, नीलम गोऱ्हे ठाकरेंच्या पक्षात होत्या, मी काही त्यांच्या पक्षात नव्हतो. त्यामुळं त्यांच्या पक्षात काय चालायचं ते नीलमताईच सांगू शकतील. मला त्याबद्दल माहिती नाही. मात्र, साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. विशेषत जे साहित्यिक आहेत, त्यांना असं वाटतं की, राजकारणी लोकांनी आमच्या व्यासपीठावर येऊ नये. मग साहित्यिकांनी देखील पार्टी लाईन्सवर कमेंट करू नये. त्यांनीही मर्यादा पाळाव्यात, असं फडणवीस म्हणाले.