विदर्भात उन्हाचा ‘रुद्रावतार’! पुढील चार दिवस बाहेर पडूच नका…हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाकडून अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

surya

surya

Heat Wave : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका प्रचंड वाढत असून जणू सुर्य आगच ओकतोयं, अशी परिस्थिती झालीयं. अनेक जिल्ह्यांमध्ये 45 अंश सेल्सिअसपर्यंत पारा गेला असून हवामान विभागाकडून अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

देशातील कापड उद्योगही अडचणीत; कापूस आयातीवर 11 टक्के शुल्क हटविण्याची सरकारकडे मागणी

विदर्भातील तीन जिल्ह्यांनी तापमानाची सर्वोच्च पातळी ओलांडली आहे. काल (18 मे) वर्धा येथे सर्वाधिक 46.5 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. या वाढत्या उष्णतेमुळे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलायं.

नागरिकांनी पुढील तीन ते चार दिवस दुपारच्या वेळेत अत्यंत आवश्यक काम नसेल तर बाहेर पडू नये, तसेच बाहेर पडताना हलक्या रंगाचे सुती कपडे घालण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. तसेच शरीरात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी ताक लिंबू पाणी, भरपूर पाणी पिण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

३ मे रोजी परीक्षा, पण २७ एप्रिललाच खेळ झाला होता; वाघमारेकडून CBI च्या हाती लागला मोठा पुरावा?

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी मोसमी वाऱ्यांनी आग्नेय अरबी समुद्र, कोमोरीन भाग आणि नैऋत्य-आग्नेय बंगालच्या उपसागराच्या अनेक भागांत यशस्वी प्रगती केली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनूसार मान्सूनने अंदमान समुद्राचा बहुतांश भाग व्यापला असून, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनची ही प्रगती वेळेआधी आणि अत्यंत समाधानकारक मानली जात आहे. सध्या हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या वाटचालीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

Exit mobile version