कडाक्याचा उन्हाळा डोळ्यांना सांभाळा; जाणून घ्या खास टिप्स, डोळे राहतील सेफ!

Eye Care Tips in Summer : सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. देशातील काही राज्यांत उष्णता प्रचंड वाढली आहे. महाराष्ट्रातही तापमानात मोठी वाढ (Mahrashtra Temperature) झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे घराबाहेर पडताना आपण काळजी घेतो. परंतु शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव असलेल्या डोळ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होते. उष्णतेचा डोळ्यांवर गंभीर परिणाम होतो. तीव्र उष्णतेमुळे डोळ्यांत कोरडेपणा निर्माण होतो. डोळ्यांत जळजळ होते. अशा वेळी डोळे चोळल्याने डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकते.
उन्हात सनग्लासेस डोळ्यांचे संरक्षण करतात. पण लोकांना माहिती नसते की डोळ्यांसाठी कोणता चष्मा वापरला पाहिजे. त्यांच्याकडून चुकीच्या चष्म्याची निवड केली जाते. यामुळे डोळ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते.
World Malaria Day : कसा फैलावतो मलेरिया, डेंग्यूपेक्षा किती वेगळा? काळजी घ्या अन् सेफ राहा
उष्णतेचा डोळ्यांवर थेट परिणाम होतो. जे लोक कॉम्प्युटर, मोबाईलचा जास्त वापर करतात. तसेच ज्या लोकांचा स्क्रीन टाइम जास्त आहे. त्या लोकांच्या डोळ्यांना उन्हाळ्यात जास्त त्रास होतो. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उच्च दर्जाच्या गॉगल्सची गरज असते. खराब क्वॉलिटीच्या गॉगल्स मुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकते. यामुळे डोळ्यांत वेदना आणि डोळे लाल होण्याची समस्या उद्भवू शकते. डोळ्यांत खाज येऊ शकते. इतकेच नाही तर डोळ्यांच्या रेटिना देखील नुकसानग्रस्त होऊ शकतात.
कोणता गॉगल राहील योग्य
उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता अतिशय जास्त असते. उन्हात तीव्र स्वरूपाचे अल्ट्राव्हायोलेट किरणे असतात. या किरणांमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. या किरणांपासून डोळ्यांचा बचाव करण्यासाठी उच्च दर्जाचे यूवी प्रोटेक्टेड गॉगल्स वापरले पाहिजेत. गॉगल खरेदी करताना नीट तपासून घेतला पाहिजे. कारण बरेच गॉगल्स फक्त दिखाव्याचे असतात. युवी किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करू शकत नाहीत. याबरोबरच गॉगलच्या योग्य फ्रेमची निवड करणे गरजेचे आहे. फ्रेम चेहऱ्यावर व्यवस्थित बसेल आणि डोळ्यांचे संरक्षण करू शकेल अशी असावी.
काही खास उपाय
उन्हापासून होणारे डोळ्यांचे नुकसान टाळण्यासाठी युवी प्रोटेक्टेड गॉगल्स बरोबरच आणखी काही काळजी घेतली पाहिजे. डोळ्यांना थंड पाणी किंवा गुलाब पाण्याने धुतले पाहिजे. डोळ्यांतील कोरडेपणा घालवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने चांगला आय ड्रॉप वापरू शकता. उन्हातून घरी आल्यानंतर डोळे थंड पाण्याने धुणे डोळ्यांना आरामदायक ठरेल.
कमीत कमी व्याजदरात कसे घ्याल पर्सनल लोन? सोपा फंडा माहिती करून घ्याच!