कमीत कमी व्याजदरात कसे घ्याल पर्सनल लोन? सोपा फंडा माहिती करून घ्याच!

कमीत कमी व्याजदरात कसे घ्याल पर्सनल लोन? सोपा फंडा माहिती करून घ्याच!

Personal Loan Low Interest Rate : सर्व प्रकारच्या कर्जांमध्ये पर्सनल लोन मिळण्यात (Personal Loan) अडचणी कमी असतात. कोणतेही कर्ज घेण्याआधी त्याची व्यवस्थित चौकशी करणे खूप गरजेचे असते. जेणेकरून भविष्यात कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. आज आपण माहिती घेणार आहोत की पर्सनल लोन कमी ईएमआय (Loan EMI) आणि व्याजदरावर कसे घेता येईल. जर पर्सनल लोन कमी व्याजदरात मिळाले तर ईएमआय देखील कमी असेल. तसेच तुम्ही कर्ज लवकरात (Loan Interest) लवकर मिटवू शकाल.

व्याजदर कमी कसा कराल

सर्वात आधी ही गोष्ट निश्चित करा की तुम्हाला पर्सनल लोन घेण्याची गरज कोणत्या खर्चामुळे निर्माण झाली. साधारणपणे लग्न, घराची दुरुस्ती यांसारख्या खर्चासाठी पर्सनल लोन घेण्याची गरज पडते. पण जर खर्च जर जास्त नसेल तर कर्ज घेणे शक्यतो टाळा.

यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला किती पैशांची आवश्यकता आहे. समजा तुम्हाला पाच लाख रुपयांची गरज असेल. एक लाख रुपये तुमची सेव्हिंग असेल. मग अशा वेळी चार लाख रुपयांचे कर्ज घ्या. यातही आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे तुमच्या खर्चाचा परिणाम तुमच्या इमर्जन्सी फंडवर (Emergency Fund) कोणत्याही परिस्थितीमध्ये पडू नये. तुम्ही जितक्या कमी रकमेचे कर्ज घेताल त्यावरील व्याजासह ईएमआय देखील तितकाच कमी राहील.

पर्सनल लोनवर आणखी कर्ज घेणे किती योग्य? Top UP चे फायदे अन् तोटे जाणून घ्याच!

यानंतर तुम्ही क्रेडिट स्कोअरचा (Credit Score) शोध घ्या. गुगल पे अॅपच्या माध्यमातून तुम्ही काही मिनिटात क्रेडिट स्कोअरची माहिती घेऊ शकता. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 720 पेक्षा जास्त असेल तर कोणतीही बँक तुम्हाला अगदी सहज कर्ज देईल. चांगला क्रेडिट स्कोअर असल्याने कदाचित व्याजदरही कमी लागेल. क्रेडिट स्कोअरच्या माध्यमातून बँक कर्जदाराची कर्ज फेडण्याची क्षमता तपासून पाहत असते.

जर तुमचा क्रेडिट स्कोअर 720 पेक्षा कमी असेल तरीसुद्धा तुम्हाला कर्ज मिळेल. आरबीआयमध्ये नोंदणीकृत अनेक एनबीएफसी किंवा वित्तीय संस्था कमी क्रेडिट स्कोअर असणाऱ्या व्यक्तींना कर्ज उपलब्ध करून देतात. पण यामध्ये व्याजदर जास्त असू शकतो.

कर्जासाठी वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर वेगवेगळे असतात. त्यामुळे विविध बँकांच्या व्याजदराची तुलना करणे विसरू नका. ज्या बँकेत तुमचे पैसे जमा असतील किंवा ज्या बँकेत तुमचा पगार जमा होत असेल त्या बँकेकडून पर्सनल लोन घेणे उपयुक्त ठरेल. कारण अशा वेळी तुम्हाला कर्ज परत करण्यात जास्त अडचणी येत नाहीत.

कमी व्याजदर आकारणाऱ्या बँकेकडून सुद्धा कर्ज घेऊ शकता. यामुळे तुमच्या कर्जाचा ईएमआय कमी राहील तसेच कर्ज परत करण्यातही जास्त अडचणी येणार नाहीत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करूनच कर्ज घेण्याच्या भानगडीत पडा. जर कर्ज घ्यायचेच असेल तर मग आधी कर्जाची व्यवस्थित चौकशी करा. कर्जाचा हप्ता आणि व्याजदर कमीत कमी कसा राहील याचीही माहिती घ्या.

‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन मिटणार…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube