Maharashtra Rain Forecast : राज्यातून मान्सूनने (Monsoon) जवळपास माघार घेतली आहे. राज्यात अनेक दिवसांपासून पाऊस सुट्टीवर गेला आहे. आता ऑक्टोबर हीटच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. मात्र, गेल्या 24 तासांत काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. अजूनही अनेक भागात पावसासाठी अनुकूल परिस्थिती दिसून येत आहे. येत्या २४ तासांत राज्यासह देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department of India) वर्तवला आहे. तर काही भागांत ढगाळ वातावरण असेल, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे
‘मी महाजनांपेक्षा मोठा आमदार, पण त्यांनाच नेहमी मोठी खाती…’; गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले
पूर्वेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टी आणि कर्नाटकच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हमावान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत महाराष्ट्रात कोल्हापूरसह कोकणातील किनारी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन तासांत कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागाद वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 18 ऑक्टोबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यानंतर कडाक्याची थंडी सुरू होईल. तर मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे.
या राज्यांत मुसळधार पाऊस
तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने 16 ते 18 ऑक्टोबर या दोन दिवसांत काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, या भागातही मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी अपेक्षित आहे
दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळपासूनच थंडी जाणवू लागली आहे, मात्र दिवसा कडक उन्हामुळे उकाडा जाणवत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये सोमवार आणि मंगळवारी पावसाची शक्यता असून त्यामुळे कमाल तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला
राज्यातील अनेक भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 35 अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. काल राज्यातील सर्वाधिक 37.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोला येथे झाली.