‘मी महाजनांपेक्षा मोठा आमदार, पण त्यांनाच नेहमी मोठी खाती…’; गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले

  • Written By: Published:
‘मी महाजनांपेक्षा मोठा आमदार, पण त्यांनाच नेहमी मोठी खाती…’; गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले

Gulabrao Patil on Girish Majajan : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीत (NCP) बंड करून शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक आमदार सत्तेत सगभागी झाले. सत्तेत नवा वाटेकरी आल्यानं शिंदे गट आणि भाजपचे आमदार नाराज झाले होते. अऩेकांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं मंत्रीपदे आणि पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. अशातच आता पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सुचक वक्तव्य केलं.

पक्ष बळकटीसाठी उबाठाची नवी खेळी, सहा बड्या नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी 

दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडाळी झाल्यानं ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारभार पाहात होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. अजित पवार गटाला 9 मंत्रीपदे मिळाली. मात्र, शिंदे गटातील नेत्यांना इच्छुक नेत्यांना मंत्रीपदे मिळाली नाहीत. अजून शिंदे गटातील आमदार हे वेट अॅंड वाचच्या भूमिकेत आहेत. मंत्रीपदे मिळाली नसल्यानं शिंदे गटात नाराजी असल्याचं बोलल्या जातं. शिवाय अनेक तगडी खाती भाजप आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली.

या संर्व घडामोडीनंतर शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी एक मोठं विधान केलं. मी गिरीश महाजनांपेक्षा मोठा आमदार आहे, मात्र त्यांना नेहमी मोठी खाती मिळतात, असं पाटील म्हणाले. विशेष म्हणजे गिरीश महाजन हे स्वत: मंचावर उपस्थित असताना गुलाबराव पाटलांनी हे विधान केल. पाटलांनी हे वक्तव्य विनोदी शैलीत केल्याचं सांगितल्या जात आहे. मात्र, पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील म्हणाले की, मी गिरीश महाजन यांच्यापेक्षा मोठा आमदार आहे, ते मोठ्या खात्याचे मंत्री असतील,याचं मला काय देणं-घेणं नाही. त्यांना सगळी मोठी खाती मिळतात. पण, मी ज्या विधानसभा मतदारसंघातून राहतो, ज्या मतदारसंघातून मी आमदार आहे, तिथे कवयित्री बहिणाबाई विद्यापीठ आहे. तिथे अशोक जैन यांचे दोन कारखाने आहेत. केशव प्रतिष्ठानही याच मतदारसंघात आहे, असं विधान केलं.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळं शिंदे गट नाराज असल्याच्या वृत्तांना बळकटीच मिळते. त्यामुळं शिंदे-फडणवीस-पवार हे नाराज आमदारांची कशी मनधरणी करतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube