पक्ष बळकटीसाठी उबाठाची नवी खेळी, सहा बड्या नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी

  • Written By: Published:
पक्ष बळकटीसाठी उबाठाची नवी खेळी, सहा बड्या नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी

Shiv Sena Expands Executive Committee: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shiv Sena) दोन गट निर्माण झाले. त्यात उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) केवळ 15 आमदार राहिले. काही निष्ठावंत शिवसैनिकांनी ठाकरे गटासोबतच (UBT) राहणं पसंत केलं. दरम्यान, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पक्षाच्या कार्यकारणीचा विस्तार करत ६ जणांचा नेतेपदी वर्णा लावली आहे. नवीन कार्यकारिणीत विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर आणि सुनील प्रभू यांचा समावेश आहे.

पाच वेळा चॅम्पियन बनलेला संघ पहिल्यांदाच गुणतालिकेच्या तळाशी; ऑस्ट्रेलियाचं नेमकं काय चुकतंय ?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकारिणीचा विस्तार केला. या विस्तारात सहा नव्या नेत्यांसह उपनेते आणि संघटकपदी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. राज्यातील पक्षवाढीस बळकटी मिळावी यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचं ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आलं. मातोश्री निवासस्थानी झालेल्या नव्या नेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांची नेतेपदी नियुक्ती करून नेते मंडळाचा विस्तार करण्यात आला. तर उपनेते म्हणून विजय साळवी (कल्याण), संजय जाधव (परभणी), संजय पवार (कोल्हापूर) राजुल पटेल, शीतल देवरू, शरद कोळी यांची नियुक्ती करण्यता आली आहे.

सरदेसाई साईनाथ दुर्गे आणि सुप्रभदा फातर्पेकर हे सचिव म्हणून काम पाहतील, असेही ठाकरे गटाने जाहीर केले आहे. तर अस्मिता गायकवाड (सोलापूर), शुभांगी पाटील (नाशिक), जान्हवी सावंत (कोकण), छाया शिंदे (सातारा), विलास वाव्हळ (मुंबई), विलास रूपवते (मुंबई), चेतन कांबळे (संभाजीनगर) यांची संघटक म्हणून नियुक्ती केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेमंडळीमध्ये एकूण 16 जणांचा समावेश आहे. त्यात मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचार, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांचा समावेश आहे, असं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. त्यात शिंदे यांनी शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगानेही शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. यानंतर उद्धव ठाकरे गटाने आपल्या पक्षाचे नाव बदलून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube