Pune Rain : पुण्यात पावसाची संततधार ; सकाळच्या मुसळधार सरींमुळे नागरिकांची धावपळ

Pune Rain : पुणे शहरासह उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम असून, सोमवारी (२ नोव्हेंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास शहरात मुसळधार पावसाने

Pune Rain

Pune Rain

Pune Rain : पुणे शहरासह उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम असून, सोमवारी (२ नोव्हेंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास शहरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा सोमवारी सकाळीही जोर कायम राहिल्याने जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवला. सोमवारी आठवड्याचा पहिला कामकाजाचा दिवस असल्याने सकाळपासूनच नोकरी, व्यवसाय तसेच शाळा-महाविद्यालयांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची वर्दळ रस्त्यांवर होती. त्यातच अचानक पावसाचा जोर वाढल्याने दुचाकीस्वारांसह पादचारी आणि वाहनचालकांची मोठी धावपळ झाली. अनेकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी दुकानांचा आडोसा आणि सुरक्षित ठिकाणांचा आधार घेतला.

शहरातील (Pune Rain) मध्यवर्ती भागांबरोबरच विविध उपनगरांमध्येही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. काही रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना संथ गतीने प्रवास करावा लागत होता. परिणामी, सकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतुकीचा वेगही प्रभावित झाला. सलग सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पावसाची अखंडित हजेरी आणि सकाळच्या सुमारास वाढलेल्या तीव्रतेमुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बारामती, इंदापूर, दौंडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि दौंड परिसरात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बारामती परिसरात अद्यापही पावसाचा जोर कायम असून, श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील उड्डाणपुलाखाली पावसापासून बचाव करण्यासाठी प्रवाशांनी आश्रय घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या इंदापूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्याला या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

विक्रमी कामगिरी, कार विक्रीने पहिल्यांदाच ओलांडला 5 लाखांचा टप्पा-

कळस परिसरात पहाटेपासून जोरदार पाऊस झाला असून, काही ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचलं आहे. ऐन दुष्काळात झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Exit mobile version