ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे; राज्यात रात्रभर मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट

मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Rain In Maharashtra

Rain In Maharashtra

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. (Rain) अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होऊन पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र, पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही. दरम्यान, आज भारतीय हवामान विभागाकडून अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. तसंच, जालना आणि इतर काही भागांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. पुण्याच्या घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पुण्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाण्यात पावसाला सुरुवात झालीये. अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.

Maharashtra Rain Update : पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांसाठी अर्लट जारी

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. जालना जिल्ह्याला आज येलो अलर्ट तर उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पावसामुळे जालना जिल्हातील शेतांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही पाऊस पडताना दिसत आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता आहे.

जालना जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट तर उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. यामुळे जिल्ह्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पुन्हा एकदा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली आहे.

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाचा कहर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. धाराशिव जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. या पावसात भूम परंडा परिसरातील नळी, दुधना, बानगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पुन्हा नद्या धोक्याच्या पातळी बाहेर प्रवाहित झाल्या आहेत.

Exit mobile version