Pune Rain : पुणे शहर आणि जिल्ह्यात आज दुपारपासून (Pune Rain) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी पंचायत झाली आहे. शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात आभाळ भरुन आलं आहे. सध्या सर्वत्र काळोख पडल्याने प्रवाशांना वाहनांच्या लाईट सुरु करून रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहने काढताना मोठी दमछाक होत आहे.
माहितीनुसार, पाषाण, बाणेर, औंध, सांगवी, पिंपरी-चिंचवड या भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे तर वारजे माळवाडी, कोथरुड, घोरपडी, लोहगावसह काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. त्याच बरोबर सिंहगड रस्त्यावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
6 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे.आज पावसाने पुणे जिल्ह्यात हजेरी लावली आहे. तर 9 ते 14 जून दरम्यान पुणे जिल्ह्यात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी पुणे जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे तर 12 ते 14 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. #imd #punerain #monsoon pic.twitter.com/RfCpEZz2Ur
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 8, 2024
साडेपाच वाजेपर्यंत कोणत्या भागात किती पाऊस
मिळालेल्या माहितीनुसार, साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर 67.4, पाषाण 56.8, इंदापूर 11.5, हडपसर 3.0, हवेली 1.5, बल्लाळवाडी 0.5 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.
पुण्यात गणेश खिंड परिसरात कार बुडाल्या ! #punerain #rainupdate #monsoon pic.twitter.com/q9ottzKqEu
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 8, 2024
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3-4 दिवसांत मध्य अरबी समुद्राचा (Arabian Sea) आणखी काही भागात तसेच महाराष्ट्रातील मुंबईसह काही भागात, तेलंगणा, कोस्टल आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग, दक्षिण छत्तीसगड आणि नैऋत्य मान्सून दक्षिण ओडिशाच्या काही भागात, पश्चिम बंगालचा उर्वरित भाग आणि वायव्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून दाखल होणार आहे.
‘आम्ही दोन्ही वेळा मराठा समाजाला आरक्षण दिलं पण …’ फडणवीसांनी सांगितले पराभवाचे गणित
याच बरोबर मान्सून येत्या काही दिवसांत उत्तर भारतासह इतर राज्यांत पोहोचण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये 20 आणि 25 जून दरम्यान मान्सून दाखल होणार आहे तर राजस्थानमध्ये 30 जून आणि 5 जुलै दरम्यान मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता आहे.