Maharashtra Rain Alert : राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु असणाऱ्या धो धो पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ऑरेंज आणि रेड अलर्ट देखील जारी करण्यात आले आहे. तर मुसळधार पावसामुळे पुणे आणि मुंबई सारख्या शहरात शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. तर पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सातारा (Satara) आणि पुणे (Pune) जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा (Maharashtra Rain Alert) अंदाज आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मुंबईसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. माहितीनुसार, खडकवासला धरणातून 2700 क्युसेसने मुठ नदी पात्रात विसर्ग सुरु झाला आहे. तर दुसरीकडे रायगड, पालघर, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
भारताचा टी-20 इतिहासातील सर्वात मोठा पराभव; इंग्लंडकडून 125 धावांनी सामना गमावला
तसेच विदर्भातील काही भागात देखील आज पावसाची शक्यता असून आता मान्सून गुजरातसह अरबी समुद्र, राजस्थानच्या दिशेने प्रगती करणार असं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.मान्सून राजस्थान, गुजरातच्या दिशेने प्रगती करणार असल्याने पुढील काही दिवसात राज्यासह देशात मान्सूनचा जोर वाढणार आहे.
