Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) , पुणे (Pune) , नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा नुकसान सहन करावा लागला आहे. तर आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने आज मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिले आहे. या भागात पुढील 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील कमी क्षेत्राच्या तीव्रतेमुळे राज्यात पूर्वमाोसमी वारे वाहत असल्याने राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार ते अतिमुसधार पाऊस होत आहे.
तर दुसरीकडे आज पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर नांदेड, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यात आज वादळी पावसाचा अंदाज असल्याने या जिल्ह्यांसाठी देखील हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे.
अन् …, राजू, श्याम आणि बाबूची जोडी फुटली, ‘हेरा फेरी 3’ मधून परेश रावल बाहेर, कारण काय?
आज कुठे कुठे पावसाचा इशारा ?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पालघर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर आणि सातारामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला आणि अमरावती येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Jaaran Trailer : काळी जादू, अंधश्रद्धा आणि विवाहितेचा भूतकाळ 5 जूनला उलगडणार ?