काळ भैरवनाथ देवस्थानामधील अन्नछत्रालयातील तेलासाठी नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून मदत

आगडगाव येथील अन्नछत्रालयात तेलासाठी उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी सव्वा सहा लाख रुपयांचा धनादेश नुकताच देवस्थानकडे सुपूर्द केला.

Untitled Design   2026 01 21T143130.917

Untitled Design 2026 01 21T143130.917

Help from Narendra Firodia for oil in Annachhatralaya : अहिल्यानगर – तालुक्यातील आगडगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानातर्फे सुरू असलेल्या अन्नछत्रालयात वर्षभर लागणाऱ्या तेलासाठी उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी सव्वा सहा लाख रुपयांचा धनादेश नुकताच देवस्थानकडे सुपूर्द केला. आगडगाव येथे प्रत्येक रविवारी सुमारे सात ते दहा हजार भाविक बाजरीची भाकरी, आमटी असा मोफत महाप्रसाद घेतात. त्यासाठी भाविकांकडून अन्नदान केले जाते. तथापि, वाढत्या गर्दीमुळे खर्चही मोठा आहे. यासाठी फिरोदिया यांच्यातर्फे वर्षभर लागणाऱ्या तेलासाठीचा खर्च दिला जातो. त्यांनी मागील वर्षीही सहा लाखांचा धनादेश दिला होता.

मुख्यमंत्री कोणताही असो दरवर्षी जानेवारीत गाठतो दाओस; पण तिथे नक्की काय होतं?

आगामी काळात आपण या उपक्रमासाठी मदत करू, असे त्यांनी सांगितले. हा धनादेश देवस्थानचे खजिनदार दिलीप गुगळे यांच्याकडे सोहम फिरोदिया यांनी सुपूर्द केला. या वेळी नरेंद्र फिरोदिया, गौरव भंडारी तसेच मान्यवर उपस्थित होते. फिरोदिया यांनी यापूर्वीही अनेकदा मदत केली आहे. मिनी बस, टेम्पो, रुग्णवाहिका देवस्थानला दिली. रुग्णवाहिकेतून कोरोना काळात अनेक रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली. याबरोबरच वारंवार होणाऱ्या अन्नदानासाठी त्यांची कायम मदत असते.

Exit mobile version