Download App

माझे सांडलेले रक्त कारणी लागले…, हेरंब कुलकर्णीकडून शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत 

Heram Kulkarni : शाळेच्या परिसरात एक किलोमीटरमध्ये तंबाखू जन्य पदार्थ विकले जाणाऱ्या पान टपऱ्या नसाव्यात असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला

Heramb Kulkarni : शाळेच्या परिसरात एक किलोमीटरमध्ये तंबाखू जन्य पदार्थ विकले जाणाऱ्या पान टपऱ्या नसाव्यात असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी स्वागत केले आहे. दीड वर्षापूर्वी हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांनी एका शाळेच्या शेजारी असलेली पानपटरी हटवल्याने त्यांच्यावर प्रणाघातक हल्ला करण्यात आला होता. शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयाचा त्यांनी स्वागत करत आज माझे सांडलेले रक्त कारणी लागले. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी म्हणाले की, शिक्षण विभागाने काल प्रसिद्ध केलेल्या नियमावलीत शाळेच्या परिसरात एक किलोमीटरमध्ये तंबाखू जन्य पदार्थ विकले जाणाऱ्या पान टपऱ्या नसाव्यात असे आदेशित केले आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो कारण दीड वर्षापूर्वी मी शाळेच्या शेजारी असलेली पानटपरी हटवली म्हणून माझ्यावर सुपारी देऊन प्राणघातक हल्ला झाला होता…आज माझे सांडलेले रक्त कारणी लागले…!!!

फक्त याची अंमलबजावणी करताना शाळेच्या मुख्याध्यापक यांच्यावर जबाबदारी टाकताना त्या गावातील ग्रामपंचायत,नगरपालिका,नगरपंचायत महापालिका व पोलिस यांच्यावर ही जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे…किंबहुना 15 जूनला शाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने शाळेभोवती असणाऱ्या या सर्व टपऱ्या काढून द्याव्यात. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. तसेच लहान मुलांसाठी बनवलेली एनर्जी ड्रिंक देखील मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याने शाळेच्या परिसरात एनर्जी ड्रिंक विकली जाणार नाहीत असाही नियम करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

राज ठाकरेंची भूमिका अन् कार्यकर्ते बुचकळ्यात, मनसे प्रवक्ते महाजनांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण 

एनर्जी ड्रिंकची राज्य सरकारने तपासणी करून त्यावर बंदी घालावी. त्याचबरोबर पालकांनी विद्यार्थ्यांना पैसे देऊ नयेत व शाळांनी विद्यार्थ्यांच्या दप्तर,खिसे तपासण्याची गरज आहे कारण मध्यंतरी नाशिक जिल्ह्यात एका शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तरात कंडोम पासून मारामारीची हत्यारे ही सापडली होती. असं देखील त्यांनी म्हटले आहे.

follow us