Download App

“पहिली ते तिसरीपर्यंत..”, शिक्षणमंत्र्यांचं हिंदीबाबत मोठं वक्तव्य, दादा भुसेंनी काय सांगितलं?

इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत तृतीय भाषेचं (हिंदी भाषा) मौखिक शिक्षण दिलं जाईल असे मंत्री दादा भुसेंनी सांगितले.

Hindi Language Controversy : राज्यात हिंदी भाषेचा विरोध सातत्याने वाढू लागला आहे. राज्य सरकार इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा (Hindi Language Controversy) म्हणून हिंदी विषयाचा समावेश करणार आहे. सरकारच्या याच धोरणाला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. मनसेने 5 जुलैला भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. उद्धव ठाकरेही 7 जुलै (Uddhav Thackeray) मराठी भाषा समन्वय समितीच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. काँग्रेसही मोर्चांना पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारने पाचवीपर्यंत हिंदी भाषेचा हट्ट सोडावा असे शरद पवार म्हणाले आहेत. या सगळ्या घडामोडींनंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हिंदी भाषेच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत तृतीय भाषेचं (हिंदी भाषा) मौखिक शिक्षण दिलं जाईल असे त्यांनी सांगितले.

दादा भुसे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हिंदी भाषेसंदर्भात राज्याची भूमिका याबाबत त्यांनी माहिती दिली. भुसे पुढे म्हणाले, इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचं मौखिक शिक्षण देण्यात येईल. पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्यांना शिक्षक मौखिक स्वरुपात शिक्षण देतील. पुस्तकं शिक्षकांसाठी असतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही याबाबतीत लिहिलं आहे. तिसऱ्या भाषेची पुस्तकं, भाषेचं लिखाण, भाषेचं अध्ययन या गोष्टी तिसरीपासून होतील असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले.

हिंदी सक्तीविरोधातील भव्य मोर्चा निघण्यापूर्वीच राज ठाकरेंचा यू-टर्न; खलबतांनंतर तारखेत बदल?

मनसेच्या मोर्चाच्या तारखेत बदल

हिंदी भाषा सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांन आज सकाळी मोर्चा (Hindi Language) काढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. पहिले मनसेकडून 6 जुलै रोजी (MNS) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता हा मोर्चा 6 जुलै ऐवजी 5 जुलै रोजी काढण्यात येणार आहे.

राजकीय खलबतांनंतर तारखेत बदल?

एकीकडे आज (दि.26) सकाळी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत 6 जुलै रोजी भव्य मोर्चा आयोजित करत असल्याची घोषणा केली होती. मात्र, अवघ्य काही तासातच या मोर्चाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. मोर्चाची तारीख फक्त बदलण्यात आली आहे. मात्र, ठिकाण आणि वेळ तीच असल्याचे राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. परंतु, राजकीय खलबतांनंतर राज ठाकरेंनी यू-टर्न घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हिंदी सक्तीचा विरोध! मराठी समन्वय समितीला उद्धव ठाकरेंची साथ; 7 जुलैच्या आंदोलनात होणार सहभागी

follow us