हिंदी सक्तीचा विरोध! मराठी समन्वय समितीला उद्धव ठाकरेंची साथ; 7 जुलैच्या आंदोलनात होणार सहभागी

हिंदी सक्तीचा विरोध! मराठी समन्वय समितीला उद्धव ठाकरेंची साथ; 7 जुलैच्या आंदोलनात होणार सहभागी

Hindi Language Controversy : राज्यात सध्या हिंदी भाषेला विरोध (Hindi Language Controversy) वाढू लागला आहे. या मुद्द्यावर राजकारणाची धार वाढली आहे. हिंदी सक्ती नकोच असा विरोधकांचा सूर आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा केली आहे. दरम्यान, आज या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि मराठी भाषा अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

दीपक पवार (Deepak Pawar) म्हणाले, शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीचे पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची  (Uddhav Thackeray) भेट घेतली. आता आम्ही येत्या रविवारी (29 जून) जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. यासाठी 7 जुलै रोजी धरणे आंदोलनही करणार आहोत. हुतात्मा स्मारक ते आझाद मैदानात आंदोलन (Mumbai News) होणार आहे.

“पाचवीपर्यंत हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा, ठाकरेंचंही बरोबरच” शरद पवार रोखठोक बोलले

उद्धव ठाकरे म्हणाले, आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. पण या भाषेची जी सक्ती केली जात आहे त्याला आमचा विरोध आहे. महाराष्ट्रानेच खऱ्या अर्थाने हिंदी चित्रपटसृष्टीला जोपासण्याचं काम केलं. मुंबईत सगळे कलाकार आले आणि येथे मोठे झाले. आता राज्य सरकारची एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे. भाषिक आणीबाणी आहे त्यामुळे आम्ही विरोध करणारच असे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले. भारतीय जनता पार्टीत जे अस्सल मराठी प्रेमी आहेत त्यांनी देखील या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.

मनसेच्या मोर्चाच्या तारखेत बदल

हिंदी भाषा सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांन आज सकाळी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. पहिले मनसेकडून 6 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता हा मोर्चा 6 जुलै ऐवजी 5 जुलै रोजी काढण्यात येणार आहे.

राजकीय खलबतांनंतर तारखेत बदल?

एकीकडे आज (दि.26) सकाळी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत 6 जुलै रोजी भव्य मोर्चा आयोजित करत असल्याची घोषणा केली होती. मात्र, अवघ्य काही तासातच या मोर्चाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. मोर्चाची तारीख फक्त बदलण्यात आली आहे. मात्र, ठिकाण आणि वेळ तीच असल्याचे राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. परंतु, राजकीय खलबतांनंतर राज ठाकरेंनी यू-टर्न घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हिंदी सक्तीविरोधातील भव्य मोर्चा निघण्यापूर्वीच राज ठाकरेंचा यू-टर्न; खलबतांनंतर तारखेत बदल?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube