अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजातील नावांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यात चांगलचं वादंग पेटलं आहे. त्यांच्या विधानानंतर ब्राह्मण समाजाकडून त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. छगन भुजबळांच्या कानाखाली मारा आणि एक लाख रुपयांचं बक्षीस जिंका, अशी घोषणाच परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केली आहे. यावेळी बोलतना त्यांनी भुजबळांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे.
‘शरद पवारांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री..,’; दिलीप वळसे पाटलांची पहिल्यांदाच टीका
देशपांडे म्हणाले, छगन भुजबळ सातत्याने गरळ ओकत आहेत. ब्राह्मण समाजाविषयी नीचपणाची विधानं ते करत आहेत. सरस्वतीचा अपमान करणारं विधानही त्यांनी केलयं, तर छगन भुजबळांनी कोणाची पुजा करावी? हा त्यांचा प्रश्न असल्याचं म्हणत विश्वजीत देशपांडेंनी छगन भुजबळांवर टीका केली आहे.
भाजप प्रवक्त्याने घेतला भुजबळांचा समाचार; ब्राह्मण समाजातील शिवाजी अन् संभाजी नावांची दिली यादी
काय म्हणाले भुजबळ?
नाशिकमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केलंयं. ते म्हणाले, ब्राह्मण समाजामध्ये शिवाजी, संभाजी अशी नावं नसतात. काही जणांना सरस्वती आवडते तर कोणाला शारदा आवडते. आम्ही त्यांना पाहिलेले नाही. पण आमचं शिक्षण महापुरुषांमुळेच झालेलं आहे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांनीच आमच्यासाठी शिक्षणासाठी दारं खुली करुन दिली असल्याचं भुजबळ म्हणाले होते.
भुजबळांच्या या विधानानंतर ब्राह्मण समाजाकडून त्याचा निषेध करण्यात आला आहे. तसेच छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य हे हिंदू समाजात तेढ निर्माण करणारं असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला आहे. त्यांनी आधीही सरस्वतीवर वक्तव्य केलं होतं आणि नंतर माफी मागितली असल्याचं ते म्हणालेत.