Women Candidates In Chhatrapati Sambhajinagar District : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महिलांसाठी विविध योजना लागू करू, असं सांगितलं. त्यांना बहिणी लाडक्या आहेत. मात्र, महिला उमेदवारांबाबत सर्वच (Women ) प्रमुख राजकीय पक्षांमध्ये कडकी आहे.
जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत अवघ्या १८ महिला उमेदवार आहेत. यामध्ये केवळ फुलंब्री आणि कन्नड याठिकाणीच प्रमुख पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली आहे. अन्य १६ उमेदवार अपक्ष किंवा छोट्या पक्षांकडून मैदानात आहेत. दरम्यान, नेहमीप्रमाणे याही विधानसभा निवडणुकीत शहरातील मध्य, पूर्व व पश्चिम या तिन्ही मतदारसंघांत एकाही मोठ्या राजकीय पक्षांनी महिला प्रतिनिधीला विधानसभा लढविण्याची संधी दिली नाही. शहरातील मध्यमध्ये १८ उमेदवार आहेत.
दुभंगलेल्या बालेकिल्ल्यात शिवसेनेत होणार मुख्य लढत; छत्रपती संभाजीनगर शहरात कोण बाजी मारणार?
त्यामध्ये तीन महिला असून, दोन अपक्ष निवडणूक लढवित आहेत. औरंगाबाद पूर्वमध्ये २९ उमेदवार असून, ६ महिला आहेत. यामध्ये पाच अपक्ष आहेत. औरंगाबाद पश्चिमसाठी १८ उमेदवार असून, तीन महिला आहेत. प्रमुख पक्षांचा विचार केला, तर फुलंब्रीमध्ये भाजपने अनुराधा चव्हाण, तर कन्नडमध्ये शिवसेनेने रावसाहेब दानवे यांच्या कन्या रंजना (संजना) जाधव यांना उमेदवारी दिली. मतदरांनामध्ये ५० टक्क्यांच्या आसपास संख्या असलेल्या महिलांना इतर ठिकाणी मात्र महिलांना दूर ठेवले आहे. पैठण, वैजापूर आणि सिल्लोड या तीन मतदारसंघांत एकही महिला उमेदवार नाही.
मैदानातील नारीशक्ती अशी
छत्रपती संभाजीनगर पूर्व (एकूण ६) शमीम शेख, नीता भालेराव, झकिरा पठाण, तसलीम बानो आणि दैवशीला झिने (सर्व अपक्ष), शीतल बनसोडे (बहुजन समाज पक्ष) छत्रपती संभाजीनगर पश्चिम (एकूण ३) पंचशीला जाधव (रिपब्लिकन बहुजन सेना), मनीषा खरात व सुलोचना आकासे (अपक्ष). छत्रपती संभाजीनगर मध्य (एक) कांचन जाम्बोटी (अपक्ष)
फुलंब्री (एकूण २) अनुराधा चव्हाण (भाजप), अॅड. अंजली साबळे (अपक्ष). कन्नड (एकूण ४) रंजना (संजना) जाधव (शिवसेना), रंजना जाधव (बहुजन समाज पार्टी), मनीषा राठोड, संगीता जाधव (अपक्ष) गंगापूर (एकूण २) अनिता वैद्य (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी), पुष्पा जाधव (अपक्ष).