Download App

कांदा खरेदी करण्याचा निर्णय कसा झाला? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं…

Dcm Ajit Pawar : कांदा उत्पादकांसह केंद्रीय मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर दोन लाख मेट्रीक टन कांदा 2410 रुपयांनी खरेदीचा निर्णय़ घेतला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. तसेच आत्तापर्यंत इतक्या तातडीने कधीच कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात न आल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Ahmednagar Crime : नगर शहरातही कोयता गँगची दहशत; दोघांना कोयत्याच्या धाकावर लुटले

कांदा निर्यात शुल्क वाढवल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात होता. अशातच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. अजित पवार म्हणाले, राज्यातला शेतकरी मोठा अडचणीत आला आहे, त्यामुळेच यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे, यांच्यासह मी केंद्रीय मंत्री शाह आणि गोयल यांच्याशी चर्चा केली.

‘आम आदमी’च्या एन्ट्रीने काँग्रेस अलर्ट; फाटाफूट टाळण्यासाठी मध्यप्रदेशात कर्नाटक प्लॅन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परदेशात जाण्याआधी निर्णय़ घेण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यानंतर चर्चेअंती हा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचं हित समोर ठेऊन हा निर्णय घेतलायं. कांदा निर्यात शुल्काबाबतही मंत्री शाह यांच्याशी चर्चा झाली असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

आमच्या मतदारसंघात दुष्काळ जाहीर करा… राष्ट्रवादीचे आमदार थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

हे सर्वसामान्यांचं सरकार असून शेतकरी अडचणीत असताना त्याच्या पाठिमागे उभं राहण्याचं काम आम्ही करीत आहोत. शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल सांगितल्यानंतर अमित शाह यांनी आधी हा निर्णय घेण्याचं ठरवलं, त्यानंतर निर्यात शुल्काबाबतही फेरविचार करुन निर्णय घेणार असल्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री शाह यांनी दिल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारचा काय निर्णय?
कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याच्या मुद्द्यावरुन राज्यात गदारोळ सुरु असताना केंद्र सरकारकडून मंगळवारी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. त्यानुसार केंद्र सरकार, नाफेड आणि एनसीसीएफ यांच्याकडून महाराष्ट्रात कांदा खरेदी केली जाणार आहे. निर्यातशुल्काच्या अटीमुळे राज्यातील बाजारपेठेत कांद्याचे भाव खाली पडण्याची भीती होती. मात्र, आता केंद्र सरकारकडून २४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदीची हमी मिळणे हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. केंद्र, सरकार, नाफेड आणि एनसीसीएफ यांच्याकडून नाशिक, लासलगाव आणि अहमदनगर याठिकाणी कांदा खरेदी केली जाईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली.

Tags

follow us