आमच्या मतदारसंघात दुष्काळ जाहीर करा… राष्ट्रवादीचे आमदार थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

आमच्या मतदारसंघात दुष्काळ जाहीर करा… राष्ट्रवादीचे आमदार थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

यंदा पावसाने नगर जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ऑगस्ट महिना संपत येत आहे तरीही अद्याप पावसाने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने आमचा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. काळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हाधिकारी डॉ. सिद्धराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे.

Pankaj Tripathi ला पितृशोक; वडील बनारस त्रिपाठींचं वृद्धापकाळाने निधन

पावसाने दडी मारल्याने नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी देखील आपल्या मतदारसंघाची परिस्थिती सांगण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली आहे.

Box Office Collection: मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून थलायवा, सनी पाजी अन् अभिषेक बच्चन भारावले!

निवेदनात काय म्हटले?
कोपरगाव मतदारसंघात मागील अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत तसेच जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी लवकरात लवकर पाहणी करावी व मतदारसंघातील सर्व गावांचा या पाहणीमध्ये समावेश करावा अशी मागणी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

संभाजी भिडे हा भिडे नाहीतर ‘किडे’; जितेंद्र आव्हाडांची जळजळीत टीका!

दरम्यान विमा काढलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सरसकट विम्याचा लाभ द्यावा अशी मागणी जिल्हा विमा प्रतिनिधी पंकज रोहोम यांच्याकडे केली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकरजी बोराळे, अपर तहसीलदार विकासजी गंबरे, तालुका कृषी अधिकारी मनोजजी सोनवणे आदी उपस्थित होते.

पावसाळा सुरु होऊन दोन महिन्याहून अधिकचा काळ ओलांडला आहे मात्र अद्यापही कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पाऊस झाला नाही. यंदाच्या वर्षी पावसाने अक्षरश जिल्ह्याकडे पाठच फिरवली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातातून खरीप पिके तर जाणारच आहे. आपल्या कोपरगाव मतदारसंघात पावसाने काही ठिकाणी उघडीप दिल्याने पिके वाळून चालले आहे. असेच राहिले तर शेतकर्‍यांच्या पदरात काहीही पडणार नाही, याची गांभीर्याने दखल घेवून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आशुतोष काळे यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube